Kumbh Mela: कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी लाखोंची गर्दी; अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह

आता हे शाहीस्नान 14 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. या शाही स्नानात 13 आखाडे सहभागी होणार आहेत. | Huge Crowds Kumbh Mela Shahi snan

Rohit Dhamnaskar | Updated on: Apr 12, 2021 | 2:24 PM
1 / 8
हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2021) सोमवारी दुसरे शाही स्नान पार पडले.

हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2021) सोमवारी दुसरे शाही स्नान पार पडले.

2 / 8

3 / 8

यंदा कोरोनामुळे कुंभमेळ्याला नेहमीपेक्षा 50 टक्केच गर्दी झाली आहे. तरीही शाही स्नानापूर्वी अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, त्यानंतरी शाही स्नानासाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत.

4 / 8

सोमवती अमवस्येच्या निमित्ताने गंगेच्या वेगवेगळ्या घाटांवर सामान्य लोकांनीही मोठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी दहावाजेपर्यंत जवळपास 17 लाख 31 हजार लोकांनी शाहीस्नान केले.

5 / 8

जुना आखाड्याचे साधू गंगेत शाही स्नान करताना.

6 / 8

यानंतर वेगवेगळ्या आखाड्यातील साधुंनी शाही स्नानाचा आनंद लुटला.

7 / 8

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शाही स्नानासाठी झालेली गर्दी डोळे विस्फारुन टाकणारी होती.

8 / 8

उत्तराखंडमध्ये रविवारी कोरोनाचे 1,333 नवे रुग्ण आढळून आले. तर 8 जणांचा मृत्यू झाला. तर हरिद्वार येथे 400 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us