Ladki Bahin Yojana Update: सरकारचा मोठा निर्णय! लाडकी बहीणच्या हप्त्यासाठी 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजेनेतंर्ग देण्यात येणारा जुलै महिन्याचा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, परंतु ऑगस्ट महिन्याचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गेम चेंजर ठरली. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता देण्यात येतो. पण गेल्या महिन्याचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिला प्रतिक्षेत आहेत. आता याबाबत मोठी अपेडट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 339 कोटी रुपये वितरित केल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी टीव्ही९ मराठीला दिली आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय (GR) देखील जारी केला आहे. यामुळे लाडक्या बहिणींना ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाने आवश्यक निधीची व्यवस्था करून ऑगस्ट हप्त्यासाठी ३३९ कोटी रुपये वितरित केले आहेत. शासन निर्णय जारी झाल्यानंतर संबंधित यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ऑगस्टचा हप्ता मिळण्यासाठी अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या. शासन निर्णय जारी झाल्याने आणि निधी वितरित झाल्याने आता लाभार्थ्यांना रक्कम लवकरच मिळण्याची शक्यता आहे.