
शीर्षासन - 1 ) शीर्षासन किंवा डोक्यावर उभे राहणे या आसनाला आसनांचा राजा म्हणतात. त्यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण वाढून केस गळण्याची समस्या दूर होते आणि केस वाढतात.

सर्वांगासन - 2 ) सर्वांगासन किंवा खांद्यावर उभे राहाणे, यामुळे रक्तसंचारण वाढते. तसेच बॉडी डिटॉक्सीफाय होते. थायरॉईड ग्रंथी हार्मोन्स संतुलन होते. त्यामुळे केसांची देखील वाढ होते.

उत्तानासन - 3 ) उत्तानासन या सोप्या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. ताण आणि तणावातून सुटका मिळते. त्यामुळे केसांच्या मुळांना उभारी मिळून केसांची वाढ होते.

वज्रासन - 5 ) वज्रासनामुळे अन्न पचण्यास मदत होते. एकूणच आरोग्याला फायदा होत असल्याने केसांना देखील फायदा होतो. प्रथिने, लोह,ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि जीवनसत्त्वे ए, सी आणि ई असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. दररोज किमान 20-30 मिनिटं काढून योगासने करा. केस निरोगी रहाण्यासाठी जीवनसत्त्वे आणि संतुलित आहार घ्या. तुमची टाळू आणि केस हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.

अधोमुख श्वानासन - 4 ) या अधोमुख श्वानासनामुळे माकड हाडाला फायदा होतो. खांदे मजबूत होतात, शरीराचा आकार ठीक रहाण्यासाठी त्याचा फायदा होतो. माकड हाड मजबूत होते. शरीराचा लवचिकपणा वाढतो. यामुळे हाथ, पाय, खांदे आणि पाठीच्या स्नायूंना फायदा होतो.

प्राणायम - ( ब्रिदींग एक्सरसाईज ) 6 - प्राणायम हा योगासनाचा मुलभूत आसन आहे. त्यामुळे ताणतणाव दूर होतो. रक्ताभिसरण वाढते. एकूणच आरोग्याचा फायदा होतो. भस्रिका या श्वसनाच्या आसनाचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. केसांच्या वाढीसाठी योगाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी, तुमची दैनंदिन दिनचर्येत सुधारणारा करावी, रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे.

या सवयी देखील अंगी बाळगा 7 ) केस निरोगी रहाण्यासाठी जीवनसत्त्वे आणि संतुलित आहार घ्या. तुमची टाळू आणि केस हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. योगाव्यतिरिक्त, ध्यान, निसर्गात चालणे किंवा शांत संगीत ऐकणे यासारख्या इतर तणाव-कमी गोष्टी करा. केसांची निगा राखणारी नैसर्गिक आणि सौम्य उत्पादने वापरा आणि जास्त तेलकट आणि तिखट आहार टाळल्यास केसांसह संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल.