
हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी नेमक्या कोणत्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. हे आपण आज बघणार आहोत.

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्याचा शरीराच्या आरोग्यावर तसेच त्वचेवर चांगला परिणाम पडतो. आपण आपल्या आहारामध्ये अनेक प्रकारे आवळ्याचा समावेश करू शकता.

रताळ्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन यांसारखे पोषक घटक असतात. हे आपल्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

हिवाळ्याच्या हंगामात आपण मुळ्याचा आहारात समावेश करावा. मुळ्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्व असते. आपण मुळ्याची भाजी तयार करून देखील खाऊ शकतो.