Rowdy Rathore Little Girl: अक्षय कुमार स्टारर ‘रावडी राठोड’मधील चिमुकली आठवतेय, तिला आज ओळखणंही झालंय कठीण, फोटो व्हायरल
Rowdy Rathore Little Girl: अभिनेता अक्षय कुमार याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. अशात सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'रावडी राठोर', सिनेमात अक्षय आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली. पण सिनेमातील आता सिनेमातील बालकलाकार सानिया अंकलेसरिया तुम्हाला आठवतेय? सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rowdy Rathore Little Girl: बॉलिवूडचा ब्लॉकबास्टर सिनेमा 'रावडी राठोर' सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आता सिनेमातील बालकलाकार सानिया अंकलेसरिया हिची चर्चा रंगली आहे. सिनेमात सानिया अंकलेसरियासह अनेक बाल कलाकारही होते.
सांगायचं झालं तर, 'राउडी राठोड' या सिनेमात यशपाल शर्माने इन्स्पेक्टर विशाल शर्माची भूमिका निभावली होती आणि सानिया अंकलेसरियाने त्याच्या मुलीची भूमिका केली होती. तिने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. आजही तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सानिया हिच्याबद्दल संगायचं झालं तर, 30 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईत जन्मलेल्या सानिया अंकलेसरियाने मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून कंप्यूटर इंजीनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. सध्या ती मुंबईत वेब डेव्हलपर म्हणून काम करते आणि नृत्य आणि अभिनयाचाही अभ्यास करते.
सानिया हिने फक्त 'रावडी राठोड' सिनेमातच नाही तर, 'रांझणा', 'लाइफ्ट गुड', 'बॉम्बरिया', 'आतंकवादी अंकल' यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. आजही तिने साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहेत.
सानिया अंकलेसरिया इंस्टाग्रामवर फारशी सक्रिय नसते. तिची शेवटची पोस्ट जुलैमध्ये होती. तिचे सुमारे 9 हजार फॉलोअर्स आहेत. सध्या सानिया हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.