LPG Shortage: ना सौदी, ना कतार, हा देश बनवतो सर्वाधिक LPG
इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धादरम्यान भारतात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई सुरु झाली आहे. सरकारने म्हटले आहे की कंपन्यांना उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. गॅसची कमतरता नाही. भारत ६० टक्के एलपीजी आयात करतो तर ४० टक्के देशात तयार करतो. मात्र जगात कोणता देश सर्वाधिक एलपीजीचे उत्पादन करतो ?

स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई - इराण आणि इस्राईल-अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारतात जाणवू लागला आहे, गॅस एजन्सीच्या बाहेर रिकामे सिलिंडर घेऊन रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्याने गॅस एजन्सींना पोलिस संरक्षण देण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियावर अशा तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे.मग, कोणता देश सर्वात जास्त एलपीजी बनवतो ते पाहूयात...(फोटो: PTI)

सर्वात जास्त एलपीजी बनवणारा देश - जगात सर्वात जास्त एलपीजीचे उत्पादन करणारा देश अमेरिका आहे. एलपीजीला कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेनंतर तयार केले जाते. रिफायनरीत कच्च्या तेलाची शुद्धी केली जाते. तेव्हा त्यातून अनेक गॅस बाहेर पडतात. एलपीजी देखील याच प्रक्रियेच्यावेळी बाहेर पडतो. (फोटो: Pixabay)

अमेरिका सर्वात पुढे का ? अमेरिका एलपीजी तयार करण्यात सर्वात पुढे का? अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सर्वात मोठे रिफायनरी नेटवर्क आहे. त्यामुळे जगातल्या मोठ्या भागाला अमेरिका स्वयंपाकाची गॅसचा पुरवठा करतो. (फोटो: PTI)

किती देश एलपीजी तयार करतात - अमेरिकेच्या नंतर एलपीजी निर्मितीत अनेक देश आहेत.त्यात रशिया, चीन, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, इराण आणि अल्जेरियाचा यात समावेश आहे. स्वयंपाकाचा एलपीजी दोन घटकांपासून तयार होतो. क्रुड ऑईल आणि नैसर्गिक गॅस हे ते दोन घटक. (फोटो: PTI)

भारत किती एलपीजी आयात करतो? आकडेवारीनुसार भारत ६० टक्के एलपीजी दुसऱ्या देशांकडून आयात करतो. सर्वाधिक आयात मध्य पूर्वेतील देशांतून होते. तर ४० टक्के एलपीजी गॅस भारतात तयार होते. सरकारने आता या कंपन्यांना प्रोडक्शन वाढवण्यास सांगितले आहे. (फोटो: PTI)