Gautami Patil: तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागलंय..; माधुरी दीक्षितने गौतमी पाटीलला विचारला थेट असा प्रश्न
Madhuri Dixit On Gautami Patil: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने गौतमी पाटीलला तिच्या लावणीमधील चुकीच्या डान्स स्टेपबद्दल प्रश्न विचारला आहे.

गौतमी पाटील आणि बिगबॉस मराठी विजेता शिव ठाकरे या दोघांनी कोण होणार करोडपती या शोमध्ये हजेरी लावली होती. हा शो माधुरी दीक्षित होस्ट करत असल्यामुळे तिने या दोघांना अनेक प्रश्न विचारले.
माधुरी दीक्षितने गौतमी पाटीलला तिच्या लावणीवरुन थेट प्रश्न विचारला, ती म्हणाली की, गौतमी लोकांची तुझ्याबद्दल अशी तक्रार आहे की, तुझ्यामुळे लावणीला गालबोट लागले आहे? यावर तु काय म्हणशील?
यावर गौतमी म्हणाली, "आता ह्या गोष्टीला चार-पाच वर्ष लोटली आहेत. माझ्याकडून ती चूक झाली, आणि ती मी मान्यही केली. मी ताबडतोब लगेच त्याबद्दल बाइट दिला की, माझ्याकडून चुकून झाले आहे, पूर्ण महाराष्ट्राची मी माफी मागते."
"यानंतर ठरवलं की लावणी करायचं म्हटलं की आंबाडा घालायचा, पायात घुंगरू बांधायचे. मी नंतर स्वत: मध्ये खूप सुधारणा केल्या." असं गौतमी पाटीलने बोलून दाखवले.
गौतमी म्हणाली की, "पण ते काय म्हणतात ना, की एकदा टॅग लागला की तोच लागतो. पण प्रेक्षकांनी मला खूप पाठींबा दिला." यावर माधुरी म्हणाली, "काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे."