AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai: बॉबी देओलच्या पाठीवर चढायला लावताच अशी झालेली ऐश्वर्याची अवस्था, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

Aishwarya Rai :अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण अभिनेता बॉबी देओल याच्या पाठीवर चढायला लावल्यानंतर ऐश्वर्याला संकोचल्यासारखं झालं. याबद्दल दिग्दर्शकाचा मोठा खुलासा केला आहे.

Aishwarya Rai: बॉबी देओलच्या पाठीवर चढायला लावताच अशी झालेली ऐश्वर्याची अवस्था, दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
ऐश्वर्या राय - बॉबी देओल
| Updated on: Nov 01, 2026 | 11:48 AM
Share

Aishwrya Rai: अभिनेत्री ऐश्वर्या राय आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ऐश्वर्या राय हिचा वाढदिवस आहे. ज्यामुळे सर्वत्र ऐश्वर्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगील आहे. सांगायचं झालं तर, 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकत ऐश्वर्या हिने जगाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मानाचा किताब मिळवल्यानंतर ऐश्वर्या हिने तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतलेला. 1997 मध्ये ऐश्वर्या हिने ‘और प्यार हो गया’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणं ऐश्वर्यासाठी प्रचंड अव्हानात्मक होतं… कारण मिस वर्ल्डच्या प्रतिमेला तिला गालबोट लागू द्यायचं नव्हतं.

ऐश्वर्या हिने दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमातील एक किस्सा राहुल यांना आजही आठवतो. जेव्हा ऐश्वर्या हिला अभिनेता बॉबी देओल याच्या पाठीवर चढायला लावलं होतं, तेव्हा तो सीन करताना ऐश्वर्या हिला संकोचल्यासारखं वाटलं. एका मुलाखतीत राहुल रवैल यांनी याबद्दल मोठा खुलासा केलेला.

कोणत्या सीव ऐश्वर्या संकोचलेली?

राहुल रवैल यांनी सांगितल्यानुसार, ‘ऐश्वर्या राज जेव्हा सेटवर आली, तेव्हा तिच्या डोक्यावर मिस वर्ल्ड म्हणजे, जगातील सर्वात सुंदर महिलाचा ताज होता. ऐश्वर्या तिच्या प्रतिमेसाठी फार गंभीर होती. मला सिंगापूर विमानतळावरील एक किस्सा आठवत आहे.

‘आम्ही एक रोमँटिक सीन शूट करत होतो. ज्यामध्ये ‘आशी’ या भूमिकेतील ऐश्वर्या हिला बालीश आणि खट्याळ दाखवायचं होतं. याच अंदाजत तिला बॉबी देओल याच्या पाठीवर चढायचं होतं. ऐश्वर्या हिला सीन समजावल्यानंतर तिने हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. ती मला म्हणाली, ‘सर, मी हा सीन करु शकत नाही, लोकं काय म्हणतील, काय विचार करतील? एक माजी मिस वर्ल्ड असं लहान मुलांसारखी कसं करु शकते…’ पण गोष्ट फक्त एक सीनची होती आणि तिच्या प्रतिमेबद्दल ती फार गंभीर होती.. असं देखील राहुल रवैल म्हणाले.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली.  त्यानंतर ऐश्वर्या फक्त तिच्या प्रोफेशलन आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. पण आता अभिनेत्री पती अभिषेक बच्चन आणि लेक आराध्या बच्चन यांच्यासोबत आलिशान आयुष्य जगत आहे.

Follow Us
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?