‘मी पुन्हा येईल….’, भाजपचा दमदार विजय, 127 जागांवर विजय मिळवल्यानंतर जल्लोष
2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईल... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...' अशी घोषणा केली होती. आता भाजपला विजय मिळाल्यानंतर राज्यात पुढच्या 48 तासात नवं सरकार स्थापन होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे...
1 / 5

भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. भाजपने 127 जागांवर विजय मिळवल्यानंतर भजप नेते सागर बंगल्यावर जमण्यास सुरुवात झाली आहे.
2 / 5

Nitesh Raneनितेश राणे यांचा विजय झाला आहे. नितेश राणे विजय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदताचं वातावरण आहे. खुद्द नितेश राणे गुलाल उधळून जल्लोष करताना दिसत आहेत.
3 / 5

भाजपच्या कार्यलयाबाहेर कार्यकर्त्यांचा विजय जल्लोष सुरु झाला आहे. वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील कार्यकर्ते जमले आहेत.
4 / 5

महाराष्ट्रात भाजप महायुतीची त्सुनामी पाहायला मिळत आहे. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला महाराष्ट्राच्या इतिहासातलं मोठं बहुमत मिळालं आहे...
5 / 5

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केलं असून महायुतीला लाडक्या बहिणींचा भरभरून आशीर्वाद मिळाल्याचं या निकालातून दिसून आलं.
Follow Us