Weather Update : गारठा वाढणार, शेकोट्या पेटणार! थंडीबाबत IMDचा महत्त्वाचा इशारा
राज्यातील काही भागांत थंडीचा जोर कायम असताना पूर्व विदर्भात आणखी गारठा वाढण्याची शक्यता आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं राहणार, जाणून घ्या सविस्तर अंदाज.

नोव्हेंबरच्या शेवटी आता राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहेत. आयएमडीने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार शनिवारी म्हणजे 28 नोव्हेंबरला राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. पूर्णपणे कोरडे हवामाना राहील.
हवामान खात्याच्या या ताज्या अंदाजानुसार रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळात थंडीचा कडाका जाणवणार आहे. कमाल तापमान हे 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमान हे 19 ते 22 पर्यंत घसरणार आहे.
कोकणातील विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथेही निरभ्र आकाश पाहायला मिळेल.
मध्य महाराष्ट्रातल्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे अहिल्यानगरमध्ये तापमान 10 ते15 अंशांपर्यंत घसरु शकते, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जास्त वाढेल. दिवसभर कोरडे आणि सूर्यप्रकाशाचे हवामान राहील.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. किमान तापमानात घट होईल. ते 14 ते 18 अंशांपर्यंत असेल. दिवसा उबदार वातावरण राहणार आहे.