आदिनाथ कोठारे याचा पहिल्याच सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, ‘ती’ आज मराठीतील कतरिना म्हणून प्रसिद्ध
अभिनेता आदिनाथ कोठारे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटर हिच्यासोबत घटस्फोट झाल्याची घोषणा अभिनेत्याने सोशल मीडियावर केली. दरम्यान अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाची चर्चा तुफान रंगली आहे.

अभिनेता आदिनाथ कोठारे याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत आदिनाथ याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेता लवकरच 'रामायण' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

'रामायण' सिनेमातील आदिनाथ याची चर्चा सुरु असताना अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. महेश कोठारे यांच्या सिनेमातून आदिनाथ याने सिनेविश्वात पदार्पण केलं. सिनेमाचं नाव होतं, 'वेड लावी जीवा...'

'वेड लावी जीवा...' सिनेमात अदिनाथ याच्यासोबत अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने स्क्रिन शेअर केली होती. 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'वेड लावी जीवा...' सिनेमा रोमाँटिक होता. सिनेमा आजही चर्चेत आहे.

वैदेही हिचा हा पहिलाच सिनेमा होता. यामध्ये वैदेही आणि आदिनाथ यांनी दिलेले ऑनस्क्रिन रोमान्स सीन चर्चे होते... पण सिनेमाचा शेवट मात्र मन हेलावणारा होता. आज वैदेही हिला देखील कोणत्या ओळखीची गरज नाही.

मराठी सिनेमाविश्वात आता वैदेही हिची ओळख मराठीतील कतरिना कैफ अशी आहे. वैदेही हिने मराठी सिनेविश्वात अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.