AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : कुणाला बसणार जबरी झटका? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम सुनावणी, शिंदे सेनेचे 5 ठळक मुद्दे कोणते?

Shiv Sena Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत शिंदे सेनेने जोरदार किल्ला लढवला. बहुमतावर शिंदे सेनेचा जोर दिसला. तर त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयानेही गुगली टाकल्याने पारडे कुणाच्या बाजूने फिरणार याविषयी चर्चा सुरू झाली.

Shivsena : कुणाला बसणार जबरी झटका? शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम सुनावणी, शिंदे सेनेचे 5 ठळक मुद्दे कोणते?
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम सुनावणीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 22, 2026 | 7:36 AM
Share

Shiv Sena Supreme Court Uddhav Thackeray-Eknath Shinde: शिवसेना मालकी हक्कावरून आणि पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर होणार यावरून सर्वोच्च युक्तीवाद सुरू आहे. पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे यांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. शिंदे सेनेने गेल्या आठवड्यात पोटतिडकीने किल्ला लढवला. बहुमताचा गजर करत विधिमंडळ आणि राजकीय पक्षाची फोड त्यांनी खोडून काढण्याचा जबरी प्रयत्न केला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या गुगलीमुळे पारडे नेमके कुणाच्या बाजूने फिरणार याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. जनतेच्या न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत शिंदे सेना किल्ला लढवताना दिसत आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. सरन्यायधीश सुर्यकांत यांच्या पीठासमोर दुपारी २ वाजल्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल. आजही शिंदेंच्या पक्षाचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करणार आहेत. गेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती बागची यांच्याकडून अनेक प्रश्न कौल यांना विचारले गेले. पक्ष आणि चिन्ह देताना चौथ्या पर्यायाचा विचार का केला नाही? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला होता. सोबतच, चिन्ह गोठवून दोन्ही पक्षांना नव चिन्ह देता आल असत का असा सवाल देखील बागची यांनी विचारलं होता. मात्र हे सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असून त्यांनी सर्व गोष्टी नियमानुसार केल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या पक्षाकडून करण्यात आला होता. आज नीरज किशन कौल हे काही जुन्या केसेसचा दाखला देत युक्तिवाद करण्याची शक्यता आहे.

शिंदे सेनेने मांडलेले पाच ठळक मुद्दे

विधिमंडळ आणि पक्षातील बहुमत

शिवसेना फुटीनंतर बहुसंख्य आमदार आणि खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वावर विश्वास दाखवला. लोकप्रतिनिधींनी राजकीय आणि विधिमंडळ दोन्ही ठिकाणी बहुसंख्येने शिंदे यांना पाठिंबा दिला. हेच खरे पक्षाचा आधार मानल्या जाते.

निवडणूक आयोगासाठी वकिली

गेल्या सुनावणीत शिंदे सेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाची वकिली केल्याचे दिसले. चिन्ह वाटप आदेश 1968 (Symbol Order 1968) नुसार, पक्षात फूट पडल्यास बहुमताच्या चाचणीच्या आधारे निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा दावा केला. आयोगाने दोन्ही बाजूंचे पुरावे ग्राह्य धरतच निष्पक्ष निर्णय दिल्याचा युक्तीवाद शिंदे सेनेकडून करण्यात आला.

पक्षातंर्गत लोकशाहीला हरताळ

ठाकरेंकडून हुकूमशाही पद्धतीने कारभार करण्यात येत होता. पक्षातंर्गत लोकशाही नांदतच नव्हती. मूळ विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्यापासून पक्ष भरकला. त्याविरोधात लोकप्रतिनिधी घटनात्मक बंडाळी केल्याचा दावा गेल्या सुनावणीत झाला.

10 अनुसूचीचा गैरवापर

ठाकरे गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिका राजकीय सूडबुद्धीने केलेल्या आहेत. पक्षांतर्गत मतभेद असणे म्हणजे पक्षांतर होत नाही, असा महत्त्वाचा युक्तीवाद करत शिवसेना पक्षातच सर्व लोकप्रतिनिधी असल्याचा आणि आपली सेना हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला.

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकाच नाण्याची बाजू

राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा महत्त्वाचा युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी वेगळी फोड करता येऊ शकत नाही अशी बाजू गेल्या सुनावणीवेळी मांडण्यात आली.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...