MSME क्षेत्रात सुवर्णसंधी, व्हायब्रंट गोवा समिटमुळे तरुण उद्योजकांचे उजळले आयुष्य
Vibrant Goa Global Business Summit: सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची तिसरी व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट अत्यंत दिमाखात पार पडली. या परिषदेला तब्बल ५८ देशांचे प्रतिनिधी, ४०० हून अधिक राष्ट्रीय प्रतिनिधी आणि हजारो तरुण उद्योजकांनी हजेरी लावली.

Vibrant Goa Global Business Summit: सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची तिसरी व्हायब्रंट गोवा ग्लोबल बिझनेस समिट अत्यंत दिमाखात पार पडली. स्थानिक उद्योजकांना या परिषदेमुळे जागतिक व्यासपीठ मिळाले. या परिषदेला तब्बल ५८ देशांचे प्रतिनिधी, ४०० हून अधिक राष्ट्रीय प्रतिनिधी आणि हजारो तरुण उद्योजकांनी हजेरी लावली. परदेशातील खरेदीदारांशी तरूण उद्योजकांचा थेट संपर्क आला. या समिटीची चर्चा देशातच नाही तर परदेशातही सुरू आहे.
तरुणांना उद्योजकतेचा मंत्र
गोव्यात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची तिसरी व्हायब्रंट ग्लोबल बिझनेस समिट झाले. या तीन दिवसांच्या परिषदेत देशातील तरूणांना जागतिक संधी, आव्हानं आणि उपाय योजना यावर उत्तम मार्गदर्शन मिळाले. आफ्रिका-इंडिया कॉन्क्लेव्ह, सेमीकंडक्टर कॉन्क्लेव्ह आणि कॉग या तीन सत्रात विविध महत्त्वाच्या मुद्यांना थेट हात घालण्यात आला. उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारातील विविध उत्पादने, सेवा आणि त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या संधी समजून घेता आल्या. या ठिकाणी २०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आली होती. त्यातून विविध उत्पादने आणि सेवांविषयीचे प्रदर्शन उपस्थितींसाठी खास मेजवाणी ठरली. परदेशी खरेदीदारही या ठिकाणी हजर असल्याने त्यांच्याशी तरुणाईला हितगुज साधता आले. त्यांच्या उत्पादनांची, नवनवीन कल्पनांची माहिती देता आली. त्यांच्याकडून काही अपेक्षा आणि नवीन कल्पना समजावून घेता आल्या.
कोट्यवधींचे सामंजस्य करार
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या परिषदेला आवर्जून हजेरी लावली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी येथील अनेक स्टॉल्सला प्रत्यक्ष भेट देत उत्पादनाची, तंत्रज्ञानाची माहिती घेतली. व्यावसायिकांशी हितगुज साधले. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. या परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारे सुमारे ८,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
साक्षात कपिल देव यांच्याशी भेटण्याची संधी
या जागतिक बिझनेस समिटचे अजून एका खास वैशिष्ट्ये म्हणजे अखेरच्या, समारोपाच्या सत्रात द क्रिकेट लीजंड आणि विश्वकप विजेता माजी कर्णधार कपिल देव यांच्याशी थेट भेटीचा योग अनेकांना स्मरणात राहिला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवीन उत्साह संचारला. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांच्या विचारांना पाठिंबा दिला. अनेकांनी हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपला. कोणी त्यांचे शब्द स्वतःच्या वैयक्तिक डायरीत जशाच्या तसे नोंदवले.
