मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; CM देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. ऐन दिवाळीत CM देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.

मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत पालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. त्यांनी मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना 2028 पर्यंत सेवानिवासस्थान (BMC Staff Headquarters) उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले. मुंबईतील आश्रय योजनेअंतर्गत काही कर्मचारी घरांच्या चाव्यांचा वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
मुंबई महापालिकेच्या घरांच्या चाव्या वितरणाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबई महानगर पालिकेने उत्तम कामगिरी केली. आश्रय योजनेअंतर्गत वर्षानुवर्षे 150 चौरस फुटाच्या पडक्या घरामध्ये ज्या ठिकाणी सामूहिक संडासाची व्यवस्था होती. अनेक सोयी नव्हत्या. आमचे सर्व महापालिकेचे शहर स्वच्छ ठेवणारे बंधू भगिनी व कर्मचाऱ्यांना 300 फुटांचं घर दिलं आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांचं अभिनंदन करतो. आतापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त खासगी इमारती निर्माण केल्या जायच्या. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी इमारत तयार करण्यात आली आहे. 100 वर्षांचे या इमारतीचं आयुष्य आहे. बांधकाम चांगलं आहे. जवळपास 30 ते 40 टक्के जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. सामूहिक सोयी देण्यात आल्या आहेत. सामूहिक हॉल देण्यात आला आहे. दहा वर्षांचं मेटेनन्स हा विकासक करणार आहे’.
‘कर्मचारी घरात राहायला गेले, तर दहा वर्ष काही पाहण्याची गरज नाही. अशा पद्धतीने पालिकने रचना केली. आमचे सफाई कर्मचारी हे सर्वांचं आरोग्य उत्तम ठेवतात. मुंबई स्वच्छ ठेवतात. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्य लाभ होतो. त्यांचं जीवन मात्र खुराड्यासारख्या अशा घराममध्ये होत होते. कल्याणकारी राज्यात, मुंबईसारखी महापालिका ही आशियातील संपन्न महापालिका आहे. त्यातील कर्मचारी अशा प्रकारे राहतात, ही भूषणावह बाब नाही. पण आजची बाब बघून आम्हाला निश्चित समाधान वाटलं. योग्यप्रकारे जीवन मिळालं पाहिजे. ते देण्याकरिता सुरुवात झाली आहे. मी राहुल नार्वेकरांचे अभिनंदन करतो. ही योजना करताना अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी नार्वेकरांनी महत्त्वाची मदत केली. अन्यथा दोन-तीन वर्ष लागले असते. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर, कुलाबा येथे दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत.
🔷याठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली नवीन १४० सेवानिवासस्थाने उपलब्ध झाली आहेत.
🔷या सदनिकांमध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयासोबत विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
🔷या संदर्भातील ही चित्रफीत…
#mybmcupdates
@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 6, 2026
‘मला या ठिकाणी सांगायचं की, लाड-पागे समिती 1973 साली तयार झाली. नंतरच्या काळात कोर्टाच्या निर्णयाने समितीचं कामकाज बंद झालं होतं. आपण वारीस पद्धत सुरू झाली. कर्मचाऱ्यांच्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी. त्यानंतर पुन्हा अडचणी आल्यानंतर कोर्टात लढलो. नंतर आम्ही लाड-पागे समिती ही लागू केली. आमचे कर्मचाऱ्यांना वेगळे हक्क अबाधित करण्याचा निर्णय घेतला. तर अगदी किमान किती वेतन मिळालं पाहिजे, यासंदर्भातील निर्णय घेतला. ऐवढंच करून थांबलो नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणि वाल्मिकी योजना सुरू केली, असे त्यांनी पुढे सांगितले.
