‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट, समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणारी ‘ती’ कोण? लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. समर आणि स्वानंदी या जोडीची केमिस्ट्री हिट ठरतेय. आता मालिकेत होणाऱ्या नव्या अभिनेत्रीच्या एण्ट्रीमुळे काय ट्विस्ट येतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Apr 30, 2026 | 9:56 AM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यामधील समर (सुबोध भावे) आणि स्वानंदी (तेजश्री प्रधान) यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. आता या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री होणार आहे.

2 / 5
मालिकेत एकीकडे समर आणि स्वानंदी एकमेकांकडे आकर्षित होत आहेत, तर दुसरीकडे मल्लिका त्यांच्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा सतत प्रयत्न करतेय. अशातच या मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. समरची जुनी मैत्रीण त्यांच्या घरी राहायला येणार असल्याचं मल्लिका स्वानंदीला सांगते.

3 / 5
मैत्रीण किमया घरी येणार असल्याचं कळताच समरला खूप आनंद होतो. पण ही किमया आहे तरी कोण, या विचारात स्वानंदी पडते. आता किमयाच्या भूमिकेत कोण झळकणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. तर अभिनेत्री पूर्वा गोखले किमयाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. यानिमित्ताने पूर्वा तब्बल नऊ वर्षांनंतर झी मराठी वाहिनीवरील मालिकेत पुनरागमन करतेय.

4 / 5
पूर्वाने याआधी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेच सईबाई भोसले यांची भूमिका साकारली होती. त्याआधी 'कुलवधू'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली होती. आता किमयाच्या एण्ट्रीनंतर समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात, त्यांच्या नात्यात काय वळण येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

5 / 5
विशेष म्हणजे पूर्वा गोखले आणि सुबोध भावे यांनी याआधीही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करायची संधी मिळाली आहे. पूर्वाला नऊ वर्षांनंतर झी मराठीच्या मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकसुद्धा खूप उत्सुक आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us