
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. मात्र, मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीही ब्रेकअपवर भाष्य केले नाहीये.

ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता मलायका अरोरा ही धमाल करताना दिसत आहे. मलायका अरोरा ही वेकेशनवर गेलीये आणि तिने खास फोटो शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या बिकिनीवरील फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.

या फोटोमध्ये मलायका अरोरा अत्यंत बोल्ड दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

मलायका अरोरा हिने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोराच्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.