
भारतात आलेल्या मुघलांनी मराठा वीरांशी अनेक लढाया लढल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ते कधीच हरवू शकले नाहीत. मुघलांना वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य कमकुवत झालंय, पण इथेच मुघल पुन्हा चुकले.

कारण आता मुघलांसमोर आव्हान होतं छत्रपती संभाजी राजेंचं. शिवाजी महाराजांसारखंच संभाजी राजे मुघलांवर काळ बनून धावून गेले. छावा सिनेमात हेच दाखवलं गेलंय. संभाजी महाराजांचा दैदिप्यमान पराक्रम पाहताना आपण जणू त्या काळाचे साक्षीदार आहोत असं वाटतं.

अभिनेता विक्की कौशलने संभाजी महाराजांची भूमिका वठवलीय. विक्की अक्षरश: ही भूमिका जगलाय. त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. या सिनेमात विक्की कौशल अनेक शस्त्रांनी मुघलांचे शीर धडापासून कलम करताना दिसला.

मराठा योद्धा हे युद्धाच्यावेळी असंख्य हत्यारांचा वापर करत होते. त्यांची शस्त्रे म्हणजे दुश्मनांसाठी काळच होता. मुघलांचं सर्वात फेव्हरेट शस्त्र दांडपट्टा होतं. त्याला पाटाही म्हटलं जातं.

या सिनेमात संभाजी महाराजांच्या हातातही दांडपट्टा दाखवण्यात आला आहे. मराठ्यांचंही दांडपट्टा हे फेव्हरेट हत्यार होतं. मराठा योद्ध्यांचं हे सर्वात खतरनाक हत्यार मानलं जातं. शिवाय हे हत्यार चालवण्यात मराठे अत्यंत निष्णांत होते.

दांडपट्टा तलवारीसारखाच असतो. त्याचं हँडल वेगळ्या पद्धतीचं असतं. तलावारीची मूठ हातात पकडल्यावर हात उघडा असतो. पण दांडपट्टा चालवताना हात झाकून ठेवावा लागतो. दांडपट्टा चालवताना हातावर दुश्मनांनी वार करू नये, हे त्यामागचं लॉजिक.

दांडपट्ट्याची जास्तीत जास्त लांबी 5 फूट असते. त्याच्या पात्याची लांबी 4 फूट लांब असते. तर त्याचे हँडल 1 फूट लांब असते. दांडपट्ट्याचं पातं (ब्लेड) अत्यंत लवचिक (लपलपीत) आणि धारदार असतं.

छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सर्वात लोकप्रिय हत्यार असल्याचं मानलं जातं. शिवाजी महाराजांचे तुम्ही जेवढेही फोटो पाहाल तर त्यात तुम्हाला त्यांच्या हातात दांडपट्टा दिसतोच दिसतो. यावरून हे शस्त्र महाराजांसाठी किती खास होतं, याची कल्पना येईल.

मराठ्यांनी याच हत्याराच्या मदतीने लढाया जिंकल्या आहेत. मराठेच नाही तर मुघलांपासून राजपुतांपर्यंत सर्वांकडेच हे हत्यार होतं. पण मराठ्यांच्या हातात दांडपट्टा पाहिल्यावर मुघल चळचळा कापायचे. त्याचं कारण म्हणजे हातात दांडपट्टा असून फायदा नाही, तो कौशल्याने चालवताही आला पाहिजे. नेमकं तेच कौशल्य मराठ्यांकडे होतं आणि म्हणूनच मराठ्यांच्या हातातील दांडपट्टा पाहिल्यावर मुघलांना घाम फुटायचा.

मराठ्यांकडे दांडपट्टा चालवण्याची खास स्किल होती. तलावरीच्या तुलनेत दांडपट्ट्याचं पातं लवचिक आणि धारदार असतं. त्याला वाकवणं कठिण असतं. ते कौशल्य मराठ्यांकडे होतं.

मराठे वीर याला पट्टाही म्हणायचा. तर यात तरबेज असलेल्यांना पट्टेकरी म्हटलं जायचं. 10 तलवार बाज एकीकडे आणि एक पट्टेकरी एकीकडे, एवढी क्षमता या पट्टेकरींमध्ये असायची.

दांडपट्टा हे आता महाराष्ट्राचं राज्य शस्त्र आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून घोषित केलं होतं. शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली होती.