India vs New Zealand 1st T20I Score And Updates : भारताची विजयी सुरुवात, नागपूरमध्ये न्यूझीलंडवर 48 धावांनी मात
India vs New Zealand 1st T20I Cricket Score and Updates Highlights in Marathi : टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या टी 20i सामन्यात पराभूत करुन विजयी सुरुवात केली. भारताचा हा नागपूरमधील सलग चौथा टी 20i विजय ठरला.

भारताने नागपुरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. न्यूझीलंडला 190 धावाच करता आल्या. भारताने नागपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 238 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंह हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अभिषेकने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रिंकुने 44 धावांनी नाबाद खेळी साकारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला दणका दिला. शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या तिघांनी 1-1 विकेट मिळवली.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : भारताची विजयी सुरुवात, नागपूरमध्ये न्यूझीलंडवर 48 धावांनी मात
भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने नागपूरमध्ये न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंत पोहचता आलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : न्यूझीलंड पहिल्या पराभवाच्या दिशेने, नागपुरात भारत जिंकणार!
न्यूझीलंडची पहिल्या टी 20i सामन्यात पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. तर टीम इंडिया विजयी सलामी देणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या पराभवाची आता औपचारिकताच बाकी आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. न्यूझीलंडने 239 धावांचा पाठलाग करताना 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत.
-
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : न्यूझीलंडला पाचवा झटका, सेट मार्क चॅपमॅन आऊट
वरुण चक्रवर्ती याने मार्क चॅपमॅन याला आऊट केलं आहे. भारताने यासग न्यूझीलंडला पाचवा झटका दिला आहे. वरुणने सेट मार्क चॅपमॅन याला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. चॅपमॅन याने 39 धावा केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : सेट ग्लेन फिलिप्स आऊट, न्यूझीलंडला चौथा धक्का, भारताचं कमबॅक
उपकर्णधार अक्षर पटेल याने सेट ग्लेन फिलिप्स याला आऊट करत भारताची डोकेदुखी घालवली आहे. अक्षरने ग्लेन फिलिप्स याला 14 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं. ग्लेनने 40 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 78 धावा केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : ग्लेन फिलिप्सचं अर्धशतक, न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा कायम
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. ग्लेनचं हे 11 वं टी 20I अर्धशतक ठरलं आहे. फिलिप्सच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला विजयाची आशा कायम आहे.
-
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : चॅपमॅनला रिंकूकडून जीवनदान, किती महागात पडणार?
टीम इंडियाने चौथ्या विकेटची संधी गमावी आहे. रिंकू सिंह याने न्यूझीलंडच्या डावातील 11 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मार्क चॅपमॅन याचा सोपा कॅच सोडला. रिंकूने चॅपमॅन याचा 15 धावांवर कॅच सोडला. त्यामुळे आता टीम इंडियाला ही चूक किती महागात पडणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : चॅपमन-ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडचा डाव सावरला
न्यूझीलंडने 239 धावांचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 87 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडला विजयसााठी 10 ओव्हरमध्ये 152 धावांची गरज आहे. चॅपमॅन 15 आणि ग्लेन फिलिप्स 48 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : वरुणने सेट जोडी फोडली, न्यूझीलंडला तिसरा झटका
वरुण चक्रवर्ती याने सेट जोडी फोडत न्यूझीलंडला तिसरा झटका दिला आहे. वरुणनने टीम रॉबिन्सन याला 21 धावांवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने न्यूझीलंडला 1 धावेवर 2 झटके दिले. त्यानंतर रॉबिन्सन आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर वरुणने रॉबिन्सन याला आऊट करत ही सेट जोडी फोडली.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : रचीन रवींद्र आऊट, न्यूझीलंडला दुसरा झटका
टीम इंडियाने न्यूझीलंडला सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा झटका दिला आहे. अर्शदीपने डेव्हॉन कॉनव्हे याला पहिल्या ओव्हरमध्ये आऊट केलं. त्यानंतर हार्दिक पंड्या याने रचीन रवींद्र याला स्लीपमध्ये अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : अर्शदीपचा धमाका, न्यूझीलंडला दुसऱ्याच बॉलवर झटका, डेव्हॉन कॉनव्हे झिरोवर आऊट
अर्शदीप सिंह याने टीम इंडियाला पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात अप्रतिम अशी सुरुवात करुन दिली आहे. अर्शदीपने न्यूझीलंडला पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर झटका दिला आहे. अर्शदीपने डेव्हॉन कॉनव्हे याला विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉनव्हेला भोपळाही फोडता आला नाही.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : टीम इंडियाची कडक बॅटिंग, न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान
टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर पहिल्या टी 20I सामन्यात 239 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. भारतासाठी अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला. रिंकूने 20 बॉलमध्ये 44 धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांनीही भारताला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. न्यूझीलंडसाठी जेकब डफी आणि कायल जेमीसन या जोडीने सर्वाधिक आणि प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : टीम इंडियाला सहावा धक्का, हार्दिक पंड्या माघारी
न्यूझीलंडने भारताला सहावा झटका दिला आहे. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. हार्दिकने 16 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 25 रन्स केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : टीम इंडियाला पाचवा धक्का, शिवम दुबे आऊट
टीम इंडियाचा डावखुरा ऑलराउंडर शिवम दुबे आऊट झाला आहे. कायल जेमिसन याने त्याच्याच बॉलिंगवर शिवम दुबे याला कॅच आऊट केलं आहे. दुबे 4 बॉलमध्ये 9 रन्स करुन आऊट झाला.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : टीम इंडियाला चौथा झटका, अभिषेक शर्मा आऊट
भारताने चौथी आणि मोठी विकेट गमावली आहे. भारताचा सेट फलंदाज अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेकने 35 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह 84 रन्स केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : टीम इंडियाला तिसरा झटका, कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारताने मोठी विकेट गमावली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. सूर्याने 22 बॉलमध्ये 32 रन्स केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : भारताच्या 10 ओव्हरमध्ये 117 धावा
भारताने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हरमध्ये 11.70 च्या रन रेटने 117 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा ही जोडी नाबाद खेळत आहे. सूर्यकुमार यादव 31 आणि अभिषेक शर्मा 60 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IND vs NZ 1st T20i Live Score Updates : अभिषेक शर्माचं अर्धशतक, सूर्यालाही सूर गवसला
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. तसेच दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादव हा देखील फटकेबाजी करत आहे. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. आता ही जोडी भारतासाठी आणखी किती धावा जोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IND vs NZ 1st T20i Live Score : अभिषेक-सूर्या जोडी जमली, कॅप्टनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
टीम इंडियाने संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताचा डाव सावरला आहे. दोघेही दोन्ही बाजूने फटकेबाजी करत आहेत. त्यामुळेया दोघांकडून भारताला अशाच मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.
-
IND vs NZ 1st T20i Live Score : इशान किशन 8 धावा करुन माघारी, भारताला दुसरा झटका
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. इशान किशन कमबॅकच्या सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. इशान किशन अवघ्या 8 धावा करुन माघारी परतला आहे.
-
IND vs NZ 1st T20i Live Score : भारताला पहिला झटका, संजू सॅमसन आऊट
न्यूझीलंडने भारताला पहिल झटका दिला आहे. भारताचा ओपनर संजू सॅमसन आउट झाला आहे. संजूने 7 बॉलमध्ये 2 फोरसह 10 रन्स केल्या.
-
IND vs NZ 1st T20i Live Score : सामन्याला सुरुवात, भारताची बॅटिंग, अभिषेक-संजू सलामी जोडी मैदानात
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध किती धावा करते हे पहिल्या डावानंतर स्पष्ट होईल.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन
न्यूझलंड प्लेइंग ईलेव्हन : टिम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), क्रिस्टियन क्लार्क, कायल जेमिसन, ईश सोढी आणि जेकब डफी.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : न्यूझीलंडने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध बॉलिंगचा निर्णय
न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. न्यूझीलंडने व्हीसीएच्या स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : तिलक-सुंदर आऊट, श्रेयस अय्यर-रवी बिश्नोई इन
तिलक वर्मा याला दुखापतीमुळे पहिल्या 3 टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे तिलकच्या जागी श्रेयस अय्यर याचा पहिल्या 3 सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. तर सुंदरला दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी फिरकीपटू रवी बिश्नोई याला संधी देण्यात आली आहे.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : इशान किशनचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळणार
विकेटकीपर फलंदाज इशान किशन पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार आहे. इशानचं यासह 2 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 20 जानेवारीला याबाबतची माहिती दिली होती.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी न्यूझीलंड टीम
मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, क्रिस्टियन क्लार्क, डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डॅरेल मिचेल, एडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम सायफर्ट, ईश सोढी आणि विल यंग.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकप्तान), रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकीपर) आणि वरुण चक्रवर्ती.
-
IND vs NZ 1st T20i Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिला टी 20i सामना
टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांची आगामी वर्ल्ड कप स्पर्धेआधीची ही शेवटची टी 20i मालिका आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत.
Published On - Jan 21,2026 5:57 PM
