Aadesh Bandekar : सासरे म्हणून आदेश बांदेकर कसे आहेत, सूनेसोबत कसंय त्यांचं नातं? ऐकून व्हाल भावूक

मराठी सिनेविश्वाचे लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम याने अभिनेत्री पूजा बरारी हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले. आशात अनेकांना पडलेला एक प्रश्न म्हणजे, सूनेसोबत सासरे म्हणून आदेश बांदेकर यांचं नातं कसं आहे? यावर त्यांनी भावूक करणारं उत्तर दिलं आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 3:01 PM
1 / 5
एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनाा जनतेने भावोजी म्हणून पाहिलं, एक नवरा म्हणून पाहिलं, मु्लगा म्हणून  पाहिल... पण  एक सासरे म्हणून आदेश बांदेकर कसे आहेत? असा प्रश्न आदेश बांदेकर यांना विचारण्यात आला.. यावर त्यांना भावूक उत्तर दिलं.

एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनाा जनतेने भावोजी म्हणून पाहिलं, एक नवरा म्हणून पाहिलं, मु्लगा म्हणून पाहिल... पण एक सासरे म्हणून आदेश बांदेकर कसे आहेत? असा प्रश्न आदेश बांदेकर यांना विचारण्यात आला.. यावर त्यांना भावूक उत्तर दिलं.

2 / 5

आदेश बांदेकर म्हणाले, 'मी एवढंच बोलेल, घरात मुलगी आली. मुलीचं स्वागत कसं करायला हवं, तसं आम्ही तिचं स्वागत केलं. मी स्वतःला सासरा म्हणण्यापेक्षा मी आता बाबा झालोय... त्यामुळे लेकीकडे आता उजवं माप जास्त झालंय...'

3 / 5

पुढे आदेश बांदेकर म्हणाले, 'नुकताच मी परदेशातून आले. सोहमला लहानपणापासून सवय होती. आल्या-आल्या माझी बॅग बघायची. रात्री 2 वाजले तरी, तो जागा राहायचा बाबाची बॅग पाहायला... आता मी परदेशातून आलो तेव्हा चार गोष्टी लेकीसाठी होत्या आणि एक लेकासाठी होती... तेव्हा तो मला म्हणाला, बाबा हे बरोबर नाही...'

4 / 5

'खरंच मुलगी घरात असणं याचा काय आनंद आहे ना... तो आता मी अनुभवत आहे. प्रत्येक घरात मुलगी असावी.. असं का म्हणतात, ते मला आता कळतंय, मुलगी मुलगी असते, ती स्त्री शक्ती आहे... हे कळतं..', असं देखील आदेश बांदेकर म्हणाले.

5 / 5

'स्वतःच्या लग्नाबद्दल आदेश बांदेकर म्हणाले, 'सुचित्रा आमच्या घरात आली, तेव्हा देखील तसंच झालं होतं. आम्ही तीन भावंड, त्यामुळे पहिली मुलगी बांदेकरांच्या कुटुंबात आली. त्यावेळी त्या तीन भावंडांनी तिच्यावर केलेलं प्रेम मी पाहिलं. आज जेव्हा आमच्या घरात मुलगी आली... मुलगी घरात आल्याचा आनंद फार वेगळा आहे. तो मी आता अनुभवतोय आणि जगतोय...' असं देखील बांदेकर म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us