Anuja Sathe : ‘मुलाला या जगात आणून…’, लग्नाला 12 वर्ष, मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर अभिनेत्री अनुजा साठेने काय म्हटलं?

Anuja Sathe : लग्नानंतर घरात पाळणा कधी हलणार? अशी चर्चा सुरु होते. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी सुद्धा याला अपवाद नसतात. सेलिब्रिटींना सुद्धा अशा प्रश्नांना सामोर जावं लागतं. प्रसिद्ध अभिनेत्री अनुजा साठे आता या विषयावर व्यक्त झाली. तिच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत.

| Updated on: Jul 01, 2025 | 4:09 PM
1 / 5
अनुजा साठे ही आजची आघाडीची अभिनेत्री आहे. मराठी मनोरंजन विश्वात तिने आज स्वत:ची ओळख बनवलीच आहे. पण मराठीसह हिंदी सिनेमा, अनेक हिट वेब सीरीजमध्ये सुद्धा अनुजाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या ती एका हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

2 / 5
अनुजा साठेच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. पण अजून मूलबाळ नाहीय. पण हा निर्णय तिने आणि तिचा नवरा सौरभ दोघांनी मिळून घेतला. या बद्दल अलीकडेच तिला एका मुलाखतीत विचारण्यात आलं. तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती.

3 / 5
अनुजा साठे मूल होऊ न देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाली की, "आम्हाला प्राणी खूप आवडतात. आम्ही प्राणी प्रेमी आहोत. आमच्याकडे चार श्वान आहेत. अजून चार असतील, तरी हरकत नाही, आम्ही त्यांना मुलच मानतो. आम्ही त्यांचा मुलांसारखा सांभाळ करतो"

4 / 5
"माझ्यामध्येसुद्धा मातृत्वाची भावना आहे. पण मला मुलांपेक्षा प्राण्यांप्रती मातृत्वाची भावना जास्त वाटते" असं अनुजा म्हणाली.

5 / 5
"आपण नशिबवान आहोत. शिक्षणासाठी फार खर्च करावा लागला नाही. पण आज ज्या वेगाने गोष्टी महाग होतायत, मुलाला या जगात आणून सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करण मला योग्य वाटत नाही" असं अनुजा साठेने सांगितलं.