मराठीमधील सुपरहिट गाणं! 562 मिलियन व्ह्यूज, बॉलिवूडने केलं कॉपी, आजही क्रेझ कायम
मराठी चित्रपटसृष्टीमधील अशी अनेक गाणी आहेत जी रिलिज होऊन कित्येक वर्ष उलटली आहेत तरीही प्रसिद्ध आहेत. आज आम्ही दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अशाच एका गाण्याविषयी सांगणार आहोत.

अनेकांना गाणी ऐकायला प्रचंड आवडतात. कोणी मराठी भाषेतील ऐकतं तर कोणाला तमिळ, तेलगू, हिंदी गाणी ऐकायला आवडतात. पण काही गाणी अशी आहेत जी प्रदर्शित होऊन बरेच वर्ष उलटली आहे. मात्र, या गाण्यांची क्रेझ कायम आहे. आज आम्ही अशाच एका हिट गाण्याविषयी सांगणार आहोत. ज्या गाण्याचा नंतर हिंदी रिमेकबी आला.
मराठी चित्रपटसृष्टीमधील हे सुपरहिट गाणे अजय-अतुल या जोडीने गायले. हे गाणे 2016मध्ये आले होते. त्यानंतर लगेच याचे हिंदी व्हर्जन आले. हे गाणे देखील अजय-अतुल याच जोडीने गायले होते.
आम्ही ज्या गाण्याविषयी बोलत आहोत ते गाणे दुसरे तिसरे कोणते नसून सुपरहिट सिनेमा सैराटमधील झिंगाट गाणे आहे. हे गाणे इतके हिट ठरले की त्याचा हिंदी व्हर्जन देखील आले.
झिंगाट या गाण्याला यूट्यूबवर जवळपास 562 मिलियन व्ह्यूज आहेत. आजही अनेक लग्नसोहळ्यांमध्ये किंवा संगीत कार्यक्रमात हे गाणे लावले जाते.
झिंगाट या गाण्यात अभिनेता आकाश ठोसर त्याची प्रेयसी रिंकू राजगुरूसोबत डान्स करताना दिसत आहे. तो गुपचूत प्रेयसीच्या घरी जातो आणि तेथे सुरू असलेल्या कार्यक्रमात नाचायला सुरुवात करतो. आजही या गाण्याची क्रेझ कायम आहे.