मारुती सुझुकीने तीन सर्वात लोकप्रिय कारना सीएनजी आणि एएमटी रुपात आणलेय, किंमत ७.९२ लाखांपासून
मारुती सुझुकी हा देशातील सर्वाधिक कार विकणारा ब्रँड असून या ब्रँडने पहिल्यांदात तीन लोकप्रिय कारना सीएनजीसह एएमटीची सांगड घालून बाजारात उतरवले आहे.

सुझुकीने Swift, Baleno आणि Dzire या सर्वात लोकप्रिय कार मॉडेल्सना CNG AMT रुपात ग्राहकांसाठी बाजारात आणले आहे.
या तीन कारची सीएनजी मॉडेल आधी केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येच उपलब्ध होते. आता नव्या मॉडेल्समध्ये फाईव्ह स्पीड ऑटो गिअर शिफ्ट ट्रान्समिशन म्हणजे ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजे CNG AMT रुपात उतरवले आहे.
यामुळे चालकाला आपोआप क्लच बदलणे आणि गिअर्स बदलता येतो., ज्यामुळे चालकाला 'टू-पेडल' ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. ड्रायव्हर क्लच न वापरता मॅन्युअली देखील गिअर्स बदलू शकतो.
Swift, Dzire आणि Baleno CNG AMT मॉडेल्समध्ये 'ड्युअल व्हेरिएबल व्हॉल्व्ह टायमिंग' आणि 'आयडल स्टार्ट-स्टॉप' तंत्रज्ञानासह सुसज्ज असे समान 1.2-लिटर Z12E चे इंजिन देण्यात आले आहे.
यात Swift CNG AMT ची किंमत 7.92 लाख, बलेनो सीएनजी AMT ची किंमत 8.32 लाख तर Dzire CNG AMT ची किंमत 8.53 लाखापासून सुरु होत आहे.