ALTO पेक्षा पण स्वस्त 3.50 लाखाची गाडी पण खरेदीदारच मिळेना, मोठ्या मुश्किलीने विकल्या गेल्या 566 कार, कुठही कार आहे ही?
32 किमी मायलेज, किंमत 3.50 लाख रुपये... तरीही मारुतीच्या या गाडीला ग्राहकच मिळत नाहीयेत. आतापर्यंत अवघ्या 566 गाड्यांची विक्री गेली आहे. विकली

मारुतीची सर्वात स्वस्त कार: मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक कार विकणारी कंपनी आहे. मात्र, कंपनीची सर्वात स्वस्त कार असलेल्या मारुती एस-प्रेसोला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
ऑक्टोबरमध्ये केवळ 566 कारची विक्री: ऑक्टोबर 2026 मध्ये मारुती एस-प्रेसोच्या फक्त 566 युनिट्सची विक्री झाली. यामुळे ही कंपनीची दुसरी सर्वात कमी विक्री होणारी कार ठरली आहे. मारुती इनव्हिक्टोची विक्री यापेक्षाही कमी झाली.
विक्रीत तब्बल 80 टक्क्यांची घसरण: गेल्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये एस-प्रेसोच्या 2,857 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. मात्र, ऑक्टोबर 2026 मध्ये हा आकडा घसरून 566 वर आला आहे. म्हणजेच वर्षभरात विक्रीत जवळपास 80 टक्क्यांची घट झाली.
किंमत फक्त 3.50 लाख रुपयांपासून: मारुती सुझुकी एस-प्रेसोची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 3.50 लाख रुपये आहे. कमी बजेटमध्ये कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक पर्याय आहे.
पेट्रोल आणि सीएनजी इंजिनचा पर्याय: या कारमध्ये 998cc K10 ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 68 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AGS ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
32.73 किमीपर्यंत मायलेज आणि दमदार फीचर्स: एस-प्रेसोच्या पेट्रोल व्हेरिएंटचे क्लेम्ड मायलेज 25.3 किमी प्रति लिटर, तर सीएनजी व्हेरिएंटचे 32.73 किमी प्रति किलो आहे. सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज, ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी फीचर्स मिळतात.