
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या ट्विटरवर अकाऊंटवर डबलडेकर बसच्या दरवाजात उभं राहिलेला फोटो पोस्ट केला आहे.

‘रिवाईंड टू चाईल्डहूड’ अशी कॅप्शन देत , आपल्या बालपणीच्या बसमधून केलेल्या आठवणी जागवल्या आहेत.

बेस्ट बसही मुंबईतल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. याच बेस्ट बसचं सचिनच्या आयुष्यातही मोलाचं स्थान आहे.

सचिननं काढलेल्या फोटोमध्ये 315 नंबरची बस राम गणेश गडकरी चौक शिवाजी पार्क या ठिकाणची असल्याचं दिसतंय.

निळं शर्ट, डार्क ब्लू जीन्समध्ये सचिनहा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेतो आहे. या फोटोच्या निमित्तानं सचिन आणि बेस्ट बसच्या आठवण्या नेमक्या काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.