AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृषामुळे मोडणार विजयचा संसार… 11 वर्षांपूर्वी अभिनेत्रीचं श्रीमंत व्यक्तीसोबत मोडलं लग्न… राणा दुग्‍गबातीसोबत अफेअर आणि…

विजय आणि तृषा यांच्या अफेअरची सर्वत्र चर्चा... 11 वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्तीसोबत अभिनेत्रीने का मोडलं लग्न? राणा दुग्‍गबातीसोबत अफेअर आणि..., सध्या सर्वत्र तृषा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

तृषामुळे मोडणार विजयचा संसार... 11 वर्षांपूर्वी अभिनेत्रीचं श्रीमंत व्यक्तीसोबत मोडलं लग्न... राणा दुग्‍गबातीसोबत अफेअर आणि...
Thalapathy Vijay
| Updated on: Mar 06, 2026 | 12:53 PM
Share

बॉलिवूड असो… हॉलिवूड असो… किंवा टॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अभिनेता थलपती विजय याच्यासोबत होत आहे. अभिनेत्याची पत्नी संगीता हिने नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचं सांगत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नात देखील विजय आणि तृषा एकत्र आल्यामुळे चर्चांना उधाण आलं. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा तृषा हिचं नातं कोणत्या पुरुषासोबत जोडण्यात आलं आहे.

11 वर्षांपूर्वी मोडलं अभिनेत्रीचं लग्न…

‘पोन्‍न‍िय‍िन सेल्‍वन’ फेम तृषा हिचं नाव विजय याच्यासोबत जोडण्यापूर्वी अभिनेता राणा दग्‍गुबाती याच्यासोबत देखील जोडण्यात आलं होतं… एवढंच नाही तर, दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं. तर, 11 वर्षांपूर्वी अभिनेत्रीचं लग्न देखील होणार होतं. एका उद्योजकासोबत अभिनेत्रीचं लग्न ठरलं होतं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही…

मिळालेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये तृषा करियरच्या उच्च शिखरावर होती… तेव्हा अभिनेत्रीने चेन्नई येथील उद्योजक वरुण मनियन याच्यासोबत साखरपुडा केलेला… लवकरच दोघांचं लग्न होईल… अशी देखील चाहत्यांमध्ये चर्चा होती. पण अचानक अभिनेत्रीने साखरपुडा मोडला… 2017 मध्ये एका मुलाखतीत अभिनेत्रीने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझं लग्नावर विश्वास आहे… पण समाजाच्या दबावामुळे आणि वयाच्या कारणामुळे मी लवकर लग्न करणार नाही… लग्न तेव्हाच करेल जेव्हा मला माझं खरं प्रेम मिळेल…’, असं तृषा म्हणाली होती.

राणा दग्‍गुबाती आणि तृषा कृष्‍णन यांचं अफेअर…

एक काळ असा होता जेव्हा राणा दग्‍गुबाती आणि तृषा कृष्‍णन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरलेला. 2017 मध्ये दोघांच्या रिलेशनच्या चर्चांनी जोर धरलेला. पण तेव्हा दोघांनी देखील नात्याचा स्वीकार केला नाही. अखेर 2018 मध्ये ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अभिनेत्याने रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलेलं. काही काळ आम्ही एकत्र होतो.. पण नंतर विभक्त झालो.. असं वक्तव्य अभिनेत्याने केलेलं…

थलापती विजय याचं लग्न, पत्नीपासून वेगळं होणं, घटस्फोट आणि विधानसभा निवडणुका

थलापती विजयचा घटस्फोट आणि तृषा कृष्णनसोबतच्या त्याच्या अफेअरच्या बातम्याही अशा वेळी चर्चेत आहेत जेव्हा तो त्याची राजकीय इनिंग सुरू करत आहे. 1999 मध्ये अभिनेत्याने संगीता सोरनलिंगम हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं देखील आहे… घटस्फोटाच्या अर्जात खुद्द संगीता हिने सांगितलं आहे की, गेल्या 2 वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळी राहत आहे. पण यावर अभिनेत्याने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...