Putin Car : मोदी यांचा पुतीन यांच्या कारमधून पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार म्हणजे फिरता अभेद्य किल्ला, काय वैशिष्ट्ये ?
कार डिप्लोमसी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत भेटीवर आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा कारने पुन्हा एकत्र प्रवास केला आहे. आतापर्यंत मोदी यांनी एकूण ११ वर्ल्ड लीडर्स सोबत कार प्रवास केला आहे. पुतीन यांच्या कारचे वैशिष्ट्य काय आहे त पाहूयात...

दिल्लीत ब्रिक्स संमेलनासाठी आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर मोदी आणि पुतिन यांच्या एकत्र कार प्रवासाच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर हे नेते कार मध्ये बसून इनोप्रोम प्रदर्शनापर्यंत एकत्र कारने गेले. ही कार पुतिन यांची अभेद्य सुरक्षा असलेली ओरस सीनेट कार आहे.
या आधी दोन्ही नेत्यांनी १२ दिवसांपूर्वीच ३१ ऑगस्ट रोजी किर्गिस्थान येथे बिश्केक येथे सोबत एकत्र प्रवास केला होता.
मोदी यांचा हा एखाद्या राष्ट्रप्रमुखासोबत केलेला हा पहिलाच प्रवास नाही. साल २०१४ नंतर मोदी यांनी बराक ओबामा, मॅक्रो यांच्यासह ११ जागतिक लीडर सोबत प्रवास केला आहे.
काय असते कार डिप्लोमसी - कार डिप्लोमसीचा साधा अर्थ हा की दोन देशांचे शीर्षस्थ नेते प्रोटोकॉल बाजूला ठेवत एक साथ एका कारने प्रवास करतात.
हा कोणताही सर्वसामान्य प्रवास नसतो, तर जगाला दाखवण्याची एक पद्धत असते की दोन्ही नेत्यांमध्ये आणि त्यांच्या देशांमध्ये किती घट्ट मैत्री आणि व्यक्तीगत दोस्ती आहे. सहजता आणि अतूट विश्वास आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भारत दौऱ्यात त्यांची लिमोझिन कार 'ऑरस सीनेट पुन्हा चर्चेत आली आहे. ७ टन वजनाची ही कार एक चालता फिरता अभेद्य किल्ला आहे.
या कारचा ९०० किलो वजनाचा दरवाजा हाताने नव्हे तर हायड्रोलिक सिस्टीमने उघडतो. या कारची टॉप स्पीड २५० किमी प्रति तास इतका आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार 'द बीस्ट'पेक्षा दुप्पट वेगाची आहे. 'द बीस्ट' कारचा वेग ११२ किमी प्रति तास आहे. ही कार देखील बुलेट आणि ब्लास्ट प्रुफ आहे.