
मोनालिसा मंनोरंजन क्षेत्रातलं एक नाव आहे, ज्या नावाचा परिचय करून देण्याची गरज लागत नाही, भोजपुर इंडस्ट्रीपासून टेलिव्हिजनपर्यंत ती खू प प्रसिध्द असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे तिने हे सगळं स्वत:च्या मेहनतीवर केलं आहे.

तिच्या अभिनय क्षेत्राबरोबर ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. अनेकांनी सोशल मीडियावर आपले फोटो टाकून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ती सुध्दा सोशल मीडियावर अधिक चर्चेत असते.

मोनालिसाने नुकतेच विना मेकअप फोटो शेअर केले आहेत, विना मेकअप फोटो का शेअर केले हे माहित नाही, परंतु मोनालिसाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना अधिक आवडल्याचे पाहायला मिळते.

व्हायरल झालेल्या फोटो मध्ये मोनालिसाने फ्लोरल प्रिंट ड्रेस घातला असून चांगल्या ड्रेसवरती तिने विना मेकअप फोटो काढला आहे. तिने फक्त केसात एक बँड घातल्याचे पाहायला मिळत आहे.

थंडीच्या दिवसात ती उन्हाची मजा घेत असताना तिचा फोटो आहे. तसेच तिचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो आहेत.

मोनालिसाच्या चेह-यावरील हास्य तिच्या अनेक चाहत्यांना थंड करणार असल्याचं पाहायला मिळतं. तिने फोटो शेअर केल्यानंतर मूड असं पोस्टमध्ये लिहिलं आहे. फोटो पाहिल्यानंतर असं वाटतंय की तिचा मेकअप करण्याचा सध्या अजिबात मूड नाही.

मोनालिसाचा प्रत्येक अंदाज तिच्या चाहत्यांना आवडत असतो. ती मेकअप मध्ये असली आणि नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिचे अनेक फोटो आवडल्याचे पाहायला मिळते.