
ब्रिटनमध्ये लंडनमध्ये बनवण्यात आलेले बकिंघम पॅलेस जगातील सर्वात महाग घर आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे हे अधिकृत निवासस्थान आणि प्रशासकीय हेडक्वार्टर आहे. वर्षनुवर्ष हे ब्रिटनच्या राजतंत्राचे प्रतीक समजले जात आहे.

बकिंघम पॅलेस 1705 मध्ये बांधण्यात आले. परंतु अनेक वेळा त्याचे पुनर्निर्माण करण्यात आले. वर्तमान काळातील गरजेनुसार त्यात बदल केले गेले. या राजमहालात सुंदर बगीचे आणि प्रसिद्ध बाल्कनी आहेत. त्या बाल्कनीत विशिष्ट प्रसंगाना शाही परिवारातील लोक येतात.

बकिंघम पॅलेसमध्ये भव्य खोल्या आहेत. कार्यक्रम आयोजनासाठी भव्य हॉल आहेत. त्या पॅलेसमध्ये शानदार आर्ट कलेक्शन आहे. हे महल एक लोकप्रिय पर्यटक स्थळसुद्धा आहे. या ठिकाणी ब्रिटनमधील राजशाहीचा इतिहास आणि समुद्धीची माहिती मिळते. बकिंघम पॅलेस जगातील सर्वात महाग घर आहे. फोर्ब्सच्या नुसार, त्या घराची किंमत 4900 दक्षलक्ष अमेरिकी डॉलर (4,10,96,52,19,700 रुपये) आहे.

एंटीलिया हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. मुंबईत 27 मजली ही इमारत आहे. जगातील ही सर्वात महाग प्रॉपर्टीपैकी ही एक आहे. 2006 ते 2010 दरम्यान ही बांधून पूर्ण झाली. यामध्ये तीन हॅलिपॅड, 168 कारसाठी पॉर्किंग, मल्टीपल स्विमिंग पूल, एक सिनेमागृह आणि इतर सुविधा आहेत.

भव्य आणि ऊंची इमारत 4,00,000 स्केअर फुटात पसरली आहे. त्या इमारतीची उंची 568 फूट आहे. युनीक डिझाइन असणाऱ्या या इमारतीत हाय-एंड मटीरियल्स क्रिस्टल, मार्बल आणि मोती वापरले आहे. मुकेश अंबानी यांचा हा बंगला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा महाग बंगला आहे. फोर्ब्सनुसार, त्याची किंमत 2000 दक्षलक्ष अमेरिकी डॉलर (16,77,56, 606 रुपये) आहे.