
1987 साली प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.

चित्रपटात अनिल कपूरच्या पात्रासोबत राहणाऱ्या अनेक अनाथ मुलांचीही कथा दाखवण्यात आली होती आणि या मुलांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या मुलांमध्ये ‘टीना’ नावाच्या एका छोट्या मुलीची भूमिका विशेष लक्षात राहिली. चित्रपटातील तिच्या निरागसतेमुळे आणि गोड अभिनयामुळे प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले होते. चित्रपटात एका बॉम्बस्फोटात ‘टीना’चा मृत्यू होणारा प्रसंग अत्यंत भावनिक होता आणि आजही अनेकांना तो प्रसंग आठवतो.

चित्रपटात ‘टीना’ची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव हुजान खोदाइजी आहे. त्या काळी आपल्या गोड अभिनयामुळे लोकप्रिय झालेल्या हुजान आता मोठी झाली असून ती खूपच सुंदर दिसत आहे.

अलीकडेच काही फोटो सोशल मीडियावर समोर आले असून ते पाहून अनेक चाहत्यांना ती ओळखू देखील येत नाहीये. हुजान खोदाईजी सोशल मीडियावर Instagram वर सक्रिय असली तरी तिने आपली प्रोफाइल प्रायव्हेट ठेवली आहे.