यशस्वी जयस्वालच नाही ‘या’ लोकप्रिय क्रिटेरच्या प्रेमात होती मृणाल ठाकुर! 5 अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपच्या चर्चा

क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यशस्वी स्वतःपेक्षा 9 वर्ष मोठी अभिनेत्री मृणाल ठाकुर हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. एका कॅफेबाहेरचा व्हिडीओ यासाठी निमित्त ठरला आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. पण यशस्वी याच्या आधी मृणालच्या नावाची चर्चा एका लोकप्रिय क्रिकेटरसोबत झालेली. एवढंच नाहीतर, 5 अभिनेत्यांसोबत देखील तिचं नाव जोडण्यात आलं आहे,

| Updated on: Jul 28, 2026 | 12:52 PM
1 / 6
काही महिन्यांपूर्वी अभिनेता धनूष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुर यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अभिनेत्याच्या घटस्फोटानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला.

2 / 6
मृणाल हिने लेखक शरद त्रिपाठी याला देखील डेट केलं आहे. दोघे 'नच बलिए 7' शोमध्ये दिसले होते. पण या शोनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. पण ब्रेकअपचं खरं काही कारण कधीच समोर आलं नाही... दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सर्वत्र रंगल्या.

3 / 6
अभिनेता कुशल टंडन याच्यासोबत देखील  मृणाल हिच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरलेला. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले... पण मृणाल आणि कुशल यांनी कधीच नात्यावर मौन सोडलं नाही.

4 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृणाल ठाकूरने अरजित तनेजालाही डेट केले होते, परंतु तिने या नात्याला कधीच दुजोरा दिला नाही. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त  होण्याचा निर्णय घेतला.

5 / 6
मृणाल ठाकुर आणि बादशाह यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. रिपोर्टनुसार, ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, चर्चा रंगल्यानंतर बादशाह याने त्या केवळ अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावलं होतं.

6 / 6
मृणाल ठाकुर हिच्या नावाची चर्चा क्रिकेटर श्रेयस अय्यर याच्यासोबत देखील रंगली. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. दावा करण्यात आलेला की, श्रेयस आणि मृणाल एकमेकांना गुपचूप डेट करत आहेत. पण या फक्त अफवा असल्याचं सांगत अभिनेत्रीने एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us