मुकेश अंबानी बनले भारतातील श्रीमंत व्यक्ती; अदानींच्या संपत्तीत घसरण, अचानक काय घडलं?
मुकेश अंबानी हे भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्ती घसरण झाली आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं...

फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर्सच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. रिलायन्सचे प्रमुख भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
अंबानी यांच्या आघाडीने गौतम अदानी यांची घसरण झाली आहे. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर एलन मस्क यांचं स्थान कायम आहे. मस्क यांचं नेटवर्क 1.007 ट्रिलियन डॉलर इतकं आहे.
फॉर्ब्सच्या यादीनुसार, मुकेश अंबानी हे जगातील अब्जधीशांच्या यादीत 25 व्या क्रमाकांवर आहे. त्यांचं नेटवर्थ 78.8 अब्ज डॉलर इतकं आहे. गौतम अदानी यांचं नेटवर्थ हे 74.9 अब्ज डॉलर इतकं आहे.
भारताच्या टॉप-5 अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदल 36.6 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर जगातील अब्जाधीशांच्या यादीत 64 व्या क्रमांकावर आहे. लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती 30.6 अब्ज डॉलर इतकी आहे. तर शिव नाडर यांची संपत्ती ही 27.4 अब्ज डॉलर इतकी आहे.
आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांना मागे टाकत झांग यिमिंग यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. यिमिंग यांचं नेटवर्थ हे 84 अब्ज डॉलर इतकं आहे. आशियातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या तर अदानी हे तिसऱ्या स्थानावर आहे.