रंगाचा ओरखडा ते इंजिनचं काम…; अंबानी कुटुंब कारचे सर्व्हिसिंग नक्की कुठे करतात?

मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया'मधील १७० हून अधिक गाड्यांची देखभाल कशी केली जाते? ६ मजल्यांचे पार्किंग आणि स्वतःच्या खासगी कारच्या सर्व्हिस सेंटरबद्दलही भाष्य करण्यात आले आहे.

| Updated on: Feb 02, 2026 | 2:06 PM
1 / 10
मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान केवळ त्याच्या उंचीसाठीच नाही, तर तिथल्या अद्ययावत सोयी सुविधांसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात १७० हून अधिक अतिमहागड्या गाड्या आहेत.

मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान केवळ त्याच्या उंचीसाठीच नाही, तर तिथल्या अद्ययावत सोयी सुविधांसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानी यांच्या ताफ्यात १७० हून अधिक अतिमहागड्या गाड्या आहेत.

2 / 10

या गाड्यांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षेसाठी अँटिलियामध्ये केलेली व्यवस्था एखाद्या फाईव्ह स्टार फॅसिलिटीलाही मागे टाकणारी आहे. अँटिलिया इमारतीचे पहिले सहा मजले केवळ पार्किंगसाठी राखीव आहेत.

3 / 10

या ठिकाणी १६८ हून अधिक गाड्या पार्क करण्याची क्षमता आहे. हे पार्किंग क्षेत्र केवळ पार्किंग लॉट नसून एक हाय-टेक झोन आहे. प्रत्येक गाडीसाठी स्वतंत्र सेन्सर, प्रगत अग्निशमन यंत्रणा आणि हवेच्या शुद्धतेसाठी एअर फिल्टरेशन सिस्टीम तिथे कार्यान्वित आहे.

4 / 10

अंबानींच्या ताफ्यात केवळ लक्झरी गाड्याच नाहीत, तर Mercedes-Benz S600 Guard आणि BMW 760Li सारख्या बुलेटप्रूफ गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांवर बॉम्बस्फोट किंवा गोळीबाराचा कोणताही परिणाम होत नाही.

5 / 10

त्यांचे वजन सामान्य गाड्यांच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याने, त्यांच्या टायर आणि इंजिनची दररोज तांत्रिक तपासणी करणे अनिवार्य असते. या गाड्या हाताळण्यासाठी शेकडो प्रशिक्षित ड्रायव्हर्सची नेमणूक करण्यात आली आहे.

6 / 10

त्यांना केवळ ड्रायव्हिंगच नाही, तर इमर्जन्सी इव्हॅक्युएशनचे म्हणजे आपत्कालीन स्थितीत सुरक्षित बाहेर पडण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या गाड्यांना वरच्या मजल्यांवर नेण्यासाठी भव्य आणि हाय-स्पीड लिफ्ट्स बसवण्यात आल्या आहेत, ज्या ४ टनांपर्यंत वजन सहज पेलू शकतात.

7 / 10

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कोट्यवधींच्या गाड्या दुरुस्तीसाठी बाहेर नेल्या जातात का? तर अजिबात नाही. अंबानींच्या गाड्यांच्या देखभालीसाठी अँटिलियाच्या सातव्या मजल्यावर एक अत्याधुनिक सर्व्हिस स्टेशन उभारण्यात आले आहे.

8 / 10

या ठिकामी परदेशी कंपन्यांकडून प्रशिक्षण घेतलेले मेकॅनिक्स तिथे २४ तास तैनात असतात. इथे रंगाचा ओरखडा काढण्यापासून ते इंजिनच्या मोठ्या कामापर्यंत सर्व काही एकाच छताखाली केले जाते.

9 / 10

महागड्या गाड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी तिथे विशेष पेंट बूथ आणि पॉलिशिंग युनिट्स आहेत. अंबानींच्या गाड्यांना सर्व्हिसिंगसाठी कोणत्याही शोरूममध्ये जावे लागत नाही, तर शोरूम दर्जाची सर्व सुविधा त्यांच्या घराच्या सातव्या मजल्यावरच उपलब्ध आहे.

10 / 10

डिस्क्लेमर - वरील माहिती विविध उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. या माहितीची अचूकता आणि त्यातील तपशिलांबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. ही माहिती केवळ वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us