मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पडलं महागात, तब्बल 19 लाखांचा चुना; नेमकं काय घडलं?

डोंबवलीतील प्रसाद सामंत यांची मुंबईतील प्रभादेवी परिसरात म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या आमिषाने १९ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाली. डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या काळात झालेली ही फसवणूक ऑनलाइन माध्यमातून घडली.

| Updated on: Jun 15, 2025 | 4:11 PM
1 / 9
मुंबईतील प्रभादेवी परिसरात म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत डोंबिवली येथील एका तरुणाची तब्बल १९ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2 / 9
या प्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

3 / 9
प्रसाद सुरेश सामंत (३२) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही फसवणूक डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत म्हणजेच जवळपास साडेतीन वर्षांहून अधिक काळ सुरु होती.

4 / 9
प्रसाद सामंत यांची ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

5 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या एका पती-पत्नीने इतर तिघांच्या मदतीने सामंत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सामंत यांना प्रभादेवीमध्ये म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

6 / 9
सुरुवातीला त्यांनी सामंत यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, घराच्या नावाखाली विविध टप्प्यांत त्यांच्याकडून पैसे उकळले. सामंत यांनी वेळोवेळी त्यांच्या मागणीनुसार रक्कम दिली.

7 / 9
अनेक वर्षे उलटूनही सामंत यांना घर मिळाले नाही, तसेच त्यांनी दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर प्रसाद सामंत यांनी अखेर रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

8 / 9
पोलिसांनी तक्रार नोंदवत तात्काळ गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात सामील असलेले पाचही आरोपी सध्या फरार आहेत.

9 / 9
पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. म्हाडाच्या घराच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे हे आणखी एक ताजे उदाहरण असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.