
वंदे भारत ही ट्रेन सध्या प्रवाशांसाठी सोईची ठरत आहे. सध्या या रेल्वेत केवळ सिटिंग चेअरच उपलब्ध आहेत. पण आता लवकरच या रेल्वेचं स्लीपर कोच व्हर्जन येणार आहे.

स्लिपर वंदे भारतविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ही स्लिपर ट्रेन कशी असणार आहे? याचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

स्लिपर वंदे भारत एक्सप्रेसला 20-22 डबे असणार आहेत. यात 857 बर्थ असणार आहेत. यातील 34 जागा या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. तर 823 या इतर प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत.

वंदे भारत ट्रेनमध्ये एकाच मोठ्या पॅन्ट्री ऐवजी प्रत्येक कोचजवळ मिनी पॅन्ट्री असणार आहे. यातून प्रवाशांना अन्नपदार्थ सर्व्ह केले जातील.

आधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज ही स्लिपर वंदे भारत एक्सप्रेस 2024 पासून लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.