भारताचा सर्वात छोटा रेल्वे प्रवास, ७ मिनिटांच्या रेल्वे प्रवासाचे भाडे ऐकून डोके चक्रावेल…
India Shortest Train Journey: केवळ सात मिनिटांचा रेल्वे प्रवास, म्हणजे ट्रेनमध्ये चढून तुम्ही सीटवर बसण्यास जाल तोपर्यंत कदाचित तुमचे स्टेशन आलेही असेल. केवळ तीन किमीच्या या रेल्वे प्रवासाच्या तिकीटांना खूप मागणी असते.

Indian Railway: 69181 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असलेल्या भारतीय रेल्वेच्या काही ट्रेनचा प्रवास मिनिटांचा तर काहींचा अनेक दिवसांचा असतो. दिब्रुगढ - कन्याकुमारी दरम्यान चालणाऱ्या विवेक एक्सप्रेस 80 ते 85 तासांत आपला प्रवास पूर्ण करतात.तर एक ट्रेन अशी देखील आहे जिचा प्रवास केवळ 7 मिनिटांतच संपतो. नागपूर ते अजनी दरम्यानचे अंतर केवळ 3 किलोमीटरचे आहे. हे अंतर 9 मिनिटात ही ट्रेन कापते.
नागपूर जंक्शन(NGP) ते अजनी (AJNI) स्टेशन दरम्यान रोज डझनावारी ट्रेन धावतात. या मार्गाने जाणाऱ्या या ट्रेन दोन्ही स्थानकावर थांबून धावते. या मार्गावर ट्रेनने धावणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. खास करुन रोज प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहेत.
नागपूर-अजनी मार्गावर 6 हून अधिक ट्रेन रोज धावतात. ट्रेनच्या कोचच्या बेसवर तिकीटांचे भाडे वेगवेगळे आहे. स्लीपर कोच पासून ते एसी कोचचा भाडे वेगवेगळे आहे.
जनरल कोचमध्ये : 60 रुपये स्लीपर कोचसाठी - 145 ते 175 रुपये , AC 3-टायर कोच : 555 रुपये , AC 2-टायर कोच: 760 रुपये , AC 1-टायर: 1,270 रुपये
रेल्वे तिकीटाचे भाडे पाहून तुम्ही अंदाज लावला असेल की या छोट्या अंतराला ट्रेनने कव्हर करण्यासाठी मागणी जास्त असते. आजूबाजू्च्या गावांचे लोक, विद्यार्थी, कामाला जाणारे लोक अशा लोकांची या ट्रेनला गर्दी असते.