
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आपल्या कॉमिक सेन्सने घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव.

या कार्यक्रमात नम्रता विविध भूमिका साकारताना दिसते.

सादरीकरणाची पद्धत, उत्तम विनोदाचं टायमिंग या सगळ्याच गोष्टीतून नम्रता अनेकांची फेव्हरिट कॉमेडियन बनली आहे.

नम्रता सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूक्समधील फोटो शेअर करत असते.

दिवाळीच्या निमित्ताने तिने खास पारंपारिक वेशात फोटोशूट केले आहे.

नम्रताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.