AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या गळ्यातील दागिन्यासारखा दिसणारा धबधबा, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी, कुठे आहे?

सध्या राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच अनेक ठिकाणचे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. यामध्ये असा एक धबधबा आहे ज्याचे नाव महिलेच्या गळ्यातील दागिन्यावर आहे. कुठे आहे हा धबधबा?

| Updated on: Jul 07, 2026 | 1:42 PM
Share
सध्या मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून काही ठिकाणचे धबधबे पहिल्याच पावसात प्रवाहित झाले आहेत.

1 / 5
अशातच आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वर परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरदऱ्या हिरव्यागार झाल्या असून अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.

2 / 5
यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने घाटात असलेला प्रसिद्ध 'नेकलेस धबधबा' पुन्हा एकदा दिमाखात वाहू लागला आहे. पावसाचा जोर वाढताच उंच कड्यावरून फेसाळत कोसळणाऱ्या या धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आणि पर्यटक मोठ्या संख्येने परिसरात दाखल होत आहेत.

3 / 5
डोंगररांगांवर दाट धुके, हिरवाईची चादर आणि त्यातून कोसळणारा नेकलेस धबधबा यामुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. स्थानिकांच्या मते, पावसाळ्यात काही दिवसांसाठीच हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होतो.

4 / 5
धबधब्याचा आकार आणि उंची यामुळे तो दूरून पाहिल्यावर गळ्यातील नेकलेसप्रमाणे भासतो. याच वैशिष्ट्यामुळे या धबधब्याला 'नेकलेस धबधबा' म्हणून ओळख मिळाली आहे.

5 / 5
Follow Us