IND vs NZ : ‘अशी हिम्मत प्रत्येकामध्ये नसते’, मोहम्मद सिराजला ड्रॉप केलं म्हणून भारताच्या प्रसिद्ध मुस्लिम क्रिकेटपटूने थोपटली गौतम गंभीरची पाठ

IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मोहम्मद सिराजला संधी दिली नाही. म्हणून चाहू बाजूंनी संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. एक्सपर्ट्स आणि फॅन्स हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल यांच्यावर तुटून पडले आहेत.

| Updated on: Nov 27, 2026 | 7:55 PM
1 / 5
पहिल्या कसोटी सामन्यातही मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलेलं. त्यामुळे आपण जिंकू शकलो नाही, असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांच मत आहे. सिराज असता तर आपण पहिली कसोटी जिंकू शकलो असतो असं काही जणांचा मत आहे. काहींनी सिराज वगळण्याचा संबंध त्याच्या मुस्लिम धर्माशी जोडला.

पहिल्या कसोटी सामन्यातही मोहम्मद सिराजला संघाबाहेर ठेवण्यात आलेलं. त्यामुळे आपण जिंकू शकलो नाही, असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांच मत आहे. सिराज असता तर आपण पहिली कसोटी जिंकू शकलो असतो असं काही जणांचा मत आहे. काहींनी सिराज वगळण्याचा संबंध त्याच्या मुस्लिम धर्माशी जोडला.

2 / 5

आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे चहूबाजूंनी टीका सुरु आहे. भारताचे माजी क्रिकेटर आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारे वसीम जाफर यांनी या विषयावर एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे.

3 / 5

टीका होऊनही आपल्या विचारांवर ठाम राहिल्याबद्दल वसीम जाफर यांनी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुबमन गिल यांचं कौतुक करताना त्यांना श्रेय दिलं आहे. वसीम जाफर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

4 / 5

जे निर्णय घेतात ते वगळता प्रत्येकाला असं वाटत होतं की, मोहम्मद सिराजला टीममध्ये संधी मिळाली पाहिजे. बऱ्याच प्रमणात असहमती आणि दबाव असताना आपल्या निर्णयांवर ठाम राहण्यासाठी प्रचंड दृढनिश्चय लागतो. प्रत्येकामध्ये अशी हिम्मत नसते असं वसीम जाफर यांनी म्हटलं आहे.

5 / 5

दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्यादिवस अखेर न्यूझीलंडने 5 बाद 246 धावा केल्या आहेत. कॅप्टन टॉम लॅथम (59) हाफसेंच्युरी आणि विकेटकिपर फलंदाज टॉम ब्लंडेल (53) विकेटवर आहेत. पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिलेला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us