Nushrratt Bharuccha : नुसरत भरूचासोबत बालीमध्ये काय घडलं? थेट आयसीयूमध्ये दाखल

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा इंडोनेशियातील बाली येथे अपघात झाला असून तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झालेलं आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला विशेष एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणण्यात आले असून, मणक्याची शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असून पूर्ण बरे होण्यासाठी काही काळ विश्रांतीची गरज आहे.

| Updated on: Oct 03, 2026 | 2:05 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा इंडोनेशियातील बाली (Bali) येथे एक भीषण अपघात झाला, अपघातात तिच्या मणक्याला (Spine) फ्रॅक्चर झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा इंडोनेशियातील बाली (Bali) येथे एक भीषण अपघात झाला, अपघातात तिच्या मणक्याला (Spine) फ्रॅक्चर झाले आहे.

2 / 5

नुसरत एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी बाली येथे गेली होती आणि काम संपवून काही दिवस सुट्ट्या घालवण्यासाठी ती तिथेच थांबली. यादरम्यान तिचा दुर्दैवी अपघात झाला. मात्र, हा अपघात नेमका कसा आणि कुठे झाला, याबाबत तिच्या टीमने अद्यापहि काही सांगितलं नाही.

3 / 5

या अपघातात तिच्या मणक्याचे हाड मोडले (Spinal Fracture) आहे. सुरुवातीला तिला बालीतील स्थानिक रुग्णालयात दाखल करून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते.

4 / 5

मणक्याच्या गंभीर दुखापतीवर तातडीने शस्त्रक्रिया (Spine Surgery) करणे गरजेचे असल्यामुळे, तिला विशेष एअर ॲम्ब्युलन्सच्या (Air Ambulance) मदतीने बालीहून थेट मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आले. मुंबईत आणल्यावर तिचे काही व्हिडिओही समोर आले असून ती स्ट्रेचरवर आणि तिला ऑक्सिजन लावल्याचे दिसून आले.

5 / 5

नुसरतच्या पब्लिसिस्टने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रुग्णालयात तिच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया केली जाईल. डॉक्टरांच्या मते तिची प्रकृती स्थिर असून पूर्ण बरी होण्यासाठी तिला काही आठवडे किंवा महिने विश्रांतीची गरज आहे. यामुळे तिचे पुढील सर्व प्रोजेक्ट्स सध्या पुढे ढकलण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us