मराठी अभिनेत्रीच्या घरी शिरलं रॉकेट, सोफा जळाला, नवऱ्यानं भडकून पोस्ट केली अन् नंतर जे घडलं…
Vivek Agnihotri Post : अभिनेत्री पल्लवी जोशी आणि पती बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या घरातील सोफ्याला आग लागली. याची माहिती पोस्ट शेअर करत दिली.

मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री पल्लवी जोशी आणि पती बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या पोस्टमुळे चर्चेत आले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की," एका रॉकेटमुळे त्यांचा सोफा जळला आहे."
ते म्हणाले, "काल रात्री, एक रॉकेट आमच्या बाल्कनीत आला. येऊन सोफ्यावर पडले. नंतर थेट आग लागली. आमच्या कुत्र्याने वेळीच सावध केले, सोफ्याचा कवर फायर रेसिस्टेंड असल्यामुळे मोठी दुर्घटला टळली."
'यावेळी आम्ही बचावलो पण इतर पीडित लोकांचे काय? दिवाळी साजरी करायला, कुणाला आवडत नाही? पण अशा प्रकारचे रॉकेट्स ही सांस्कृतिक अभिनमानाची गोष्ट नाही, तर धोकाच आहे" असे ते म्हणाले.
आपली संस्कृती निष्पाप लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे समर्थन करत नाही, मला आशा आहे की, प्रशासन मुंबईतील या आगीच्या घटनांची चौकशी करेल, जो कोणी कायद्याचे उल्लंघन करेल, तिथे लोकांना जबाबदार धरेल, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
"यानंतर काही वेळातच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. एक नवीन ट्विट करत म्हणाले की, मला कुणालाही दुखवायचे नाही, कोणत्याही ,सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय विचारांना प्रोत्साहन देण्याचा, कमी लेखण्याचा माझा हेतू नाहीये." असं त्यांनी नवीन पोस्टमध्ये म्हटवले.