पत्नीच्या अकस्मात मृत्यूनंतर एकटा पडला अभिनेता, 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न ?

अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अकाली निधनाने चाहते सुन्न झाले. तिचा पती पराग त्यागी आजही तिच्या आठवणींमध्ये जगतोय. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये त्याने पुनर्विवाहाबाबत स्पष्ट मत मांडलं.

| Updated on: Feb 17, 2026 | 10:08 AM
1 / 8
इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या स्टारपैकीच एक म्हणजे, 'कांटा लगा' गर्ल अर्थात शेफाली जरीवाला.. गेल्या वर्षी म्हणजेच 27 जून 2025 रोजी शेफालीचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. ( Photos : Instagram)

2 / 8
शेफालीच्या अकस्मात निधनाच्या बातमीने चाहते अतिशय दुःखी झाले. ती या जगात नाहीये यावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी आजही कठीण आहे. तिच्या निधनानंतर तिचा पती, अभिनेता पराग त्यागी एकटा पडला आहे.

3 / 8
पराग आजही त्याच्या पत्नीच्या आठवणींच्या सोबतीने जगत आहे, तो शेफालीसोबतचे अनेक क्षण, तिच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याने तिचं अस्तित्व संपू दिलेलं नाही. पराग नुकताच अभिनेता पारस छाब्राच्या पॉटकास्टमध्ये पोहोचला.

4 / 8
या पॉडकास्टमध्ये परागने शेफालीबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. बोलता बोलता पारस छाब्राने त्याला विचारलं,  की तू पुन्हा लग्न करशील का  ?  त्यावर परागने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं होतं.

5 / 8
त्यावर पराग म्हणाला, "मला फक्त विचारायचं आहे, लग्न का? " तेव्हा पारस त्याला म्हणाला,  " कोणीतरही सोबत हवं ना, बरोबर? म्हातारपण येत आहे. तुम्हाला शारीरिकदृष्ट्याही तुमच्यासोबत कोणीतरी हवं ना.."

6 / 8
पारसचा प्रश्न ऐकून पराग म्हणाला, त्याआधीच मी निघून जाईन.. ते ऐकून पारस म्हणाला, अरे असं बोलू नये.. मात्र परागने त्याला स्पष्टच बोलला, मला ती वेळंच यायला नको आहे. मी व्हीलचेअरवर असेन आणि स्वत:चा तोलंही सांभाळू शकत नसेन.. असं आयुष्य नकोच..

7 / 8
मला तशी वेळच यायला नकोय.  मी असं म्हणणार नाही मी एकटा आहे. ती ( शेफाली) शरीर सोडून गेली, पण ती अजूनही माझ्यासोबत आहे.

8 / 8
ते ऐकून पारस म्हणाला की, शेफाली गेल्यावर तू जास्त रोमँटिक झाला आहेस. मात्र त्यावर परागने सांगितलेलं उत्तर खरंच ऐकण्यासारखं आहे.  पराग म्हणाला, "मी आधी आकारावर प्रेम करायचो. आता मला निराकार आवडतो." शेफाली जरीवाला आणि आणि पराग हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल व्हायचे, हजारो फॉलोअर्स होते.