Penny Stock:  35 कोटींचा जमवला गल्ला… 10 रुपयाचा शेअर सुसाट… गुंतवणूकदार मालामाल

Share Market: या शेअरवर सोमवारी बाजारात गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. या आठवड्यात शेअर बाजाराला बरंच काही गवसलं आहे. आत्मविश्वास मिळाला आहे. बाजाराने चांगलीच झेप घेतली आहे. गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 4:49 PM
1 / 6
शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात तेजीचे सत्र आले. गेल्या काही आठवड्यात बाजाराला सूर गवसला नाही. शुक्रवारी  निफ्टी 50 इंडेक्स 461.30 अंक वा 1.99 टक्क्यांनी वधारून 23,622.90 अंकावर पोहचला. त्याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांना झाला. बाजारात अनेक दिवसांनी तेजी आल्याने गुंतवणूकदारांचा चेहरा खुलला.

2 / 6
बाजारातील तेजीनंतर  ए-1 लिमिटेड या कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा शेअर  4.94 टक्क्यांनी वधारून 8.50 रुपयांवर पोहचला. या कंपनीला घरगुती बाजारात जवळपास 35 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

3 / 6
ए-1 लिमिटेडला तीन चांगल्या औद्योगिक कंपन्यांकडून जवळपास 35 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.  सोलर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजकडून जवळपास 12 कोटी रुपये, साई बाबा पॉलिमर टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडकडून 11 कोटी रुपये आणि महाधन ॲग्रीटेक लिमिटेडकडून 12 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली.

4 / 6
ही कंपनी केवळ रसायनांच्या व्यापारावर अवलंबून नाही, तर आता इलेक्ट्रिक व्हेईकल मोबिलिटी क्षेत्रातही उडी घेतली आहे. ए1 सुरेजा इंडस्ट्रीज या सहाय्यक कंपनीत ए-1 लिमिटेडने 51 टक्के खरेदी केली आहे. तिला उपकंपनी केले आहे. ही उपकंपनी ईव्ही क्षेत्रात काम करणार आहे.

5 / 6
 ए-1 लिमिटेड ही कंपनी औद्योगिक ॲसिड आणि खास रासायनाचा पुरवठा करते. घातक रसायनांची वाहतूक आणि लॉजिस्टिक कमी वेळेत हाताळण्याचे काम कंपनी करते. चालू तिमाहीत कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची जोरदार वाढ झाली.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ  माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us