
अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्स | पेरूमध्ये थोडं अॅसिडिक गुणधर्म असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास अॅसिडिटी वाढू शकते. ज्यांना छातीत जळजळ होते त्यांनी पेरु खाऊ नये

बद्धकोष्ठता | पेरूच्या बिया जर नीट न चावता खाल्ल्या तर त्या पचायला कठीण जातात आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.ज्यांना आधीच पचनतंत्राशी संबंधित समस्या आहे, त्यांनी पेरू खाणं मर्यादित करावं आणि बिया न काढता खाणं टाळावं.

इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) | पेरूमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट फुगणे, गॅस, मळमळ यांसारख्या समस्या होऊ शकतात.

डायव्हर्टिक्युलायटिस | पेरूच्या बिया लहान असतात. अशा बिया आतड्यांमध्ये अडकू शकतात, जे डायव्हर्टिक्युलायटिसच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात.

पेरू मध्यम ग्लायसेमिक फळ असलं तरी, काही पेशंट्सना त्यांच्या डायटमध्ये साखरेचं नियंत्रण कठीण जात असल्यास, हे फळही मर्यादित खावं लागतं. कोणतीही समस्या असल्यास सर्वात आधी डॉक्टरांशी संपर्क साधा