
जगातील प्रत्येकाला आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटतं, मात्र काही लोक असेही असतात ज्यांना आपलं घर इतरांपेक्षा हटके असावं असं वाटतं. आज जगातील अशाच काही हटके आणि चकीत करणाऱ्या घरांचा आढावा.

दगडांपासून बनलेलं हे घर खूप आगळंवेगळं आहे. याला 'हाउस ऑफ स्टोन्स' किंवा 'बोल्डर हाउस' किंवा 'कासा डो पेनेडो' अशी नावं आहेत. हे घर पुर्तगालमध्ये आहे. ते 1974 मध्ये बांधण्यात आलंय. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे या घरात एक जलतरण तलाव (स्विमिंग पुल) देखील आहे. तो स्विमिंग पुल दगडांना घासून बनवण्यात आलाय.

पाण्याच्या मधोमध हे छोटंसं सुंदर घर सर्बियात आहे. त्याच्या चारही बाजूंनी जंगल आणि पाणी आहे. त्यामुळे त्याचं सौंदर्य आणखीच वाढतं. हे घर बांधून आता जवळपास 50 वर्षे झाल्याचं सांगितलं जातं.

या घराचं नाव 'वन लॉग हाउस' असं आहे. अमेरिकेतील हे घर 2000 वर्षे जुन्या झाडावर बनवण्यात आलंय. याच्या आत 13 फूट लांब जागा आहे. यात एक बेडरुम आहे.

विचित्र दिसणारं हे घर तुर्कीत आहे. हे घर ज्वालामुखीच्या राखेपासून बनलंय. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लाखो वर्षांपूर्वी या भागात एक ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. त्यापासून तयार झालेल्या उंचच उंच डोंगरामध्येच लोकांनी आपलं घर बनवलं.