
ग्रामपंचायत निवडणुकीचं आज मतदान होतंय. पवार कुटुंबाचं मूळगाव असलेल्या काटेवाडीतही आज मतदान पार पडलं.

अजित पवार आजारी असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांचे कुटुंबीय काटेवाडीत मतदानासाठी दाखल झाले.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्री पवार यांनी काटेवाडीत जात मतदान केलं. काटेवाडीत आमचा विजय निश्चित आहे. बारामतीत पहिल्यापासून राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यामुळे आम्ही निवडून येणार, असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.

तसंच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यादेखील मतदान केंद्रावर पोहोचल्या. मी 27 वर्षांची असल्यापासून इथं मतदान करत आहे. बारामतीत खूप बदल झालेत, असं यावेळी त्या म्हणाल्या.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे. माझ्या डोळ्या देखत त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं आशाताई पवार यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होतेय.