
शेतकऱ्यांकडून एमएसपीवर शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. 24 जानेवारीच्या आकडेवारीनुसार केंद्राने सध्या सुरू असलेल्या विपणन सत्र 2021-22 मध्ये आतापर्यंत 606.19 लाख टन धान खरेदी केले आहे. सर्वाधिक धानाची खरेदी पंजाबमधून झाली आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “आतापर्यंत सुमारे 77 लाख शेतकऱ्यांना 1,18,812.56 कोटी रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ झाला आहे.”, येणाऱ्या काळात शेतमाल एमएसपीद्वारे खरेदी केली जाईल, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. सध्या शेतीपध्दतीमध्ये बदल करुन पुन्हा सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न सरकार स्तरावर सुरु आहे. हे करीत असताना त्यामधील बारकावे लक्षात यावेत तसेच आपल्या कृषी विद्यापीठाकडे असलेल्या यंत्रणाचा आणि अनुभवी कृषितज्ञांचा यामध्ये फायदा होणार आहे

कृषी विद्यापीठांना येणाऱ्या काळात संशोधनासाठी प्रोत्साहन दिलं जाईल.

जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सौर उर्जेचा वापर वाढवण्यात येणार जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी जलसिंचन योजनेतून तब्बल 9 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नदीजोड योजना राबवली जाईल. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कृषी विद्यापींठाच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीच्या समावेश करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचं निर्मला सितारमण यांनी जाहीर केलं आहे. देशातील सर्व कृषी विद्यापीठांना आधुनिक, झिरो बजेट तसेच तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी अभ्यासक्रम आखण्याचे सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारने यावेळी शेतकऱ्यांना एमएसपीअंतर्गत तब्बल 2.7 लाख कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

शेतीच्या कामांसाठी किसान ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पिकांचे मूल्यमापन व्हावे यासाठी किसान ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

शेतीच्या कामासाठी कीटकनाशक फवारणी आणि इतर कामांसाठी किसान ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून औषधी, किटकनाशक तसेच न्यूट्रीशन्स फवारणीसाठीदेखील ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रोत्सहित केले जाणार आहे. कृषी विद्यापीठांना झिरो बझेट शेती, ऑरगॅनिक फार्मिग, आधुनिक शेतीचा प्रसार तसेच प्रचार व्हावा अभ्यासक्रम तयार करण्याचे सांगितले जाणार आहे.