
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या पद यात्रा करत आहेत. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून ते ठिकठिकाणी भेटी देत आहेत.

युवा संघर्ष पदयात्रा सध्या बीडमध्ये आहे. तिथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाशी रोहित पवार यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत शेतात जेवण केलं.

कापूस वेचतानाचा फोटो रोहित पवार यांनी शेअर केलाय. मराठवाड्यात परिस्थिती खूप बिकट आहे. सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, असं रोहित पवार म्हणाले.

बीड जिल्ह्यातील ईट गावातील सुशिक्षित बेरोजगार युवा महादेव जाधव यांच्या चहाच्या टपरीला रोहित पवार यांनी भेट दिली. तिथे चहा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, असं रोहित पवार म्हणाले.

बीड शहरात युवा संघर्ष यात्रेत दिव्यांग भगिनीने आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या यात्रेला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.