
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त आज ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.

पुण्यातील सारस बाग परिसरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुष्पहार अर्पण केला.

पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं.

देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.