अशी जोडी पुन्हा होणे नाही, प्राजक्ता माळीचे त्या अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल, कोण आहे तो?
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे.

या फोटोत ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतील ललित प्रभाकरसोबत दिसत आहे. दोघांची ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
यानंतर प्राजक्ताने ललितसोबतचे काही रोमँटिक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मात्र आता तब्बल 13 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर एका नव्या सिनेमातून पुन्हा एकत्र येत आहेत. नुकतंच दोघांनी रोमँटिक अंदाजात या सिनेमाची घोषणा केली.
सध्या तिचे हे ललित प्रभाकरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर आता आम्हाला प्रचंड उत्सुकता लागली आहे असं म्हटलं आहे. तसेच काहींनी या दोघांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.