
निकोलस ऑजुला यांनी डोनाल्ड ट्रम्पचा विजय आणि कोरोना महामारीसंदर्भात भविष्य वर्तवले होते. ते भविष्य सत्य ठरले. सन 2025 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य ऑजुला यांनी वर्तवले आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत तिसरे महायुद्ध होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

ऑजुला यांनी दावा केली की, पर्यावरणाचे नुकसान झाल्यामुळे पृथ्वीमध्ये अनेक बदल होणार आहेत. हवामान बदल आणि हवामानातील धोकादायक या घटना मानवजातीसाठी सन 2025 मध्ये आव्हानात्मक ठरणार आहेत.

2025 मध्ये पारंपारिक मूल्ये परत येतील असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय विज्ञानात क्रांतिकारी प्रगती होणार असल्याचे ऑजुला यांनी म्हटले आहे. या वर्षी प्रयोगशाळेत मानवी अवयवांची निर्मिती होणार आहे. ही एक मोठी वैज्ञानिक क्रांती असणार आहे.

ऑजुला यांनी म्हटले की, केटी पेरीला 2025 मध्ये वैवाहिक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, तर केट ब्लँचेटसाठी हे वर्ष यशस्वी होईल. ते अनेक पुरस्कार जिंकतील.

ऑजुला याने कोरोना, हॅरी आणि मेगनची ओप्रा मुलाखत, ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळ आणि नोट्रे डेम आग यासारख्या मोठ्या घटनांचा भविष्य वर्तवले होते. परंतु टीकाकार म्हणतात की त्याचे अंदाज अनेकदा अस्पष्ट आणि सामान्य असतात.